शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर करणारच आहेत. त्यासोबत शेतकऱ्याला भविष्यात मदतीसाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत, यादृष्टीने ‘भाजप’ सरकार प्रयत्नशील आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या प्रवेशाने आजरा तालुक्यासह जिल्ह्यात भाजपा मजबूत झाली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडे येथे अण्णा-भाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन व अशोक चराटी यांच्या भाजप प्रवेशप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सूतगिरणीचे उद्घाटन झाले. कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस यांनी प्रास्ताविकात सूतगिरणीच्या वाटचालीचा आढावा घेतला.अण्णा-भाऊ संस्था समूहाला सर्व प्रकारचे सहकार्य राहील, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादन खर्चात शासनाची भागीदारी व आलेल्या उत्पादनाला भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी संपन्न होणार नाही.सहकारमंत्री देशमुख म्हणाले, सरकारकडून सूतगिरण्यांना दिला जाणारा पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा आहे. मागील पंधरा वर्षांत भरमसाट सूतगिरण्यांना मान्यता देऊन सूतगिरणी उभी करणारे कार्यकर्ते पैशासाठी सत्तेसमोर झुलत राहिले पाहिजेत, अशी यंत्रणा राबविली गेली. १७०० कोटी रुपये शासनाने सूतगिरण्यांना दिले, पण किती सूतगिरण्या सुरू झाल्या हा संशोधनाचा विषय आहे. आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भाजपच्या झंझावातामुळे अनेक राजकीय पक्षांची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर असून कोणी संघर्ष यात्रा तर कोणी आत्मक्लेश यात्रा काढत आहे. शेतकऱ्यांमध्ये केवळ संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.चराटी म्हणाले, १९८९ ला नोंदणी झालेली सूतगिरणी खडतर प्रवासातून उभी राहिली. आजपर्यंत आपणाला कोणी जवळ केले नाही. परंतु, भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे आपण भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आजरा नगरपंचायतीसह तालुक्यातील विविध प्रकल्प मार्गी लावणे, कारखान्यात डिस्टीलरी प्रकल्प उभा करणे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.सरपंच वंदना कांबळे, भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, रवींद्र आपटे, गोपाळराव पाटील, बाबा देसाई, भरमूअण्णा पाटील, प्रकाश चव्हाण, डी. सी. काणे, समरजितसिंह घाटगे, अरुण देसाई, राहुल देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुधीर मुंज, मलिककुमार बुरूड, संजयबाबा घाटगे, दीपक सातोस्कर, अजित चराटी, विजयकुमार पाटील, शामली वाघ, सूतगिरणीसह अण्णा-भाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी व अधिकारी, संचालक, सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक शंकर टोपले यांनी आभार मानले.‘आजरा रोल मॉडेल’आजरा सूतगिरणी हे या क्षेत्रात रोल मॉडेल असून या सूतगिरणीसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही देतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी चराटींनी भाजपात प्रवेश केला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे सहकारमंत्री देशमुख यांनी नमूद केले. जिल्ह्यातील प्रमुख मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आत भाजपव्यतिरिक्त काही शिल्लक असावे असे वाटत नाही, अशी टिप्पणीही सहकारमंत्री देशमुख यांनी केली. ३० सरपंच भाजपात !चराटी यांच्यासह ३० गावचे सरपंच, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संभाजी बापट, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक नारायण सावंत यांच्यासह अण्णा-भाऊ संस्था समूहातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, केवळ या समूहाच्या महत्त्वूपर्ण योगदानामुळे आमदारकी भूषविणारे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शुभेच्छा देऊन तेथून निघून जाणे पसंद केले. त्याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.