शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात वादळी वाऱ्याने कोसळलेला सव्वाशे वर्षांपूर्वीचा वृक्ष शेतकऱ्यांनी दिला पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:29 IST

कसबा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील 'गोसावी मळी' येथील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या वृक्ष वारंवार सांगूनही महापालिकेने तोडून न नेल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा वृक्ष आज पेटवून दिला .

ठळक मुद्देबावड्यात वादळी वाऱ्याने कोसळलेला सव्वाशे वर्षांपूर्वीचा वृक्ष शेतकऱ्यांनी दिला पेटवूनमहापालिकेचे दुर्लक्ष

रमेश पाटीलकसबा बावडा :  कसबा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील 'गोसावी मळी' येथील सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वीचा वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या वृक्ष वारंवार सांगूनही महापालिकेने तोडून न नेल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा वृक्ष आज पेटवून दिला .कसबा बावडा व परिसरात दोन महिण्यापूर्वी झालेल्या वादळी पावसात सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीचा बावडा -एमआयडीसी पुला शेजारील गोसावी मळीतील भलामोठा वडाचा वृक्ष कोसळला होता. हा वृक्ष तोडून महापालिकेने त्याची लाकडे स्मशानभूमीतील जळणासाठी वापरावीत म्हणून शेतकऱ्यांनी स्थानिक नगरसेवक व महापालिकेला कळवले होते.

तसेच नगरसेवकांनीही याबाबत महापालिकेला कळवले होते. परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुढे पूर आल्यावर हा भला मोठा वृक्ष पुलाच्या कमानीला अडकून पुलाला धोका निर्माण करेल या शक्यतेने शेतकऱ्यानी नाईलाजाने हा कोसळलेला वृक्ष शेवटी आज पेटवून दिला.दोन महिन्यापूर्वी जोरदार झालेल्या वादळी वारे व पावसात बावडा- एमआयडीसी रोड वरील अनेक विद्युत खांब व झाडे उन्मळून पडली होती. काही दिवसांनी विद्युत विभागाने कोसळलेले पूल पुन्हा उभे केले. महापालिकेने या रोडवर व नागरी वस्तीत पडलेली झाडेही हटवली. मात्र सव्वाशे वर्षांपूर्वी चा भला मोठा डेरेदार वृक्ष खाजगी जागेत असल्याच्या कारणामुळे महापालिकेने लक्ष दिले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.

हा वृक्ष हटवावा म्हणून गोसावी मळीतील २४ भागीदार शेतकऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांना हा वृक्ष तोडून घेण्याबाबत सांगीतले. परंतु महापालिकेकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.दोन आठवडे लाकडे पुरली असती...

हा वृक्ष महापालिकेने जर तोडून नेला असता तर किमान दोन आठवडाभर त्यांना कोल्हापुरातील स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी लाकडे पुरली असती. पण महापालिकेने याकडे लक्ष दिले नाही.- बाबासो दळवीशेतकरी,कसबा बावडा

अद्याप वेळ गेलेली नाही....सध्या पेटवून दिलेला वृक्ष पूर्णपणे जळून जाण्यास काही दिवसाचा अवधी जाणार आहे. महापालिका अजूनही हा वृक्ष तोडून त्याची लाकडे स्मशानभूमीसाठी वापरू शकते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर