शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे

By admin | Updated: August 8, 2014 00:44 IST

कृषीविषयक मार्गदर्शनही हवे

फलटण : ‘पूर्वी शेती पंचागावर केली जात असे अलीकडे ते शास्त्र निरुपयोगी ठरत असून, मान्सूनच्या लहरीपणाचा परिणाम शेती उत्पादनावर होत असताना हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील कृषी महाविद्यालय आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या कृषी हवामान वेधशाळेचे उद्घाटन व त्यानंतर आयोजित कार्यक्रमात रामराजे बोलत होते. यावेळी कृषी हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी पुणे) विभागाचे डॉ. एन. चट्टोपाध्याय, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषीतज्ज्ञ आर. व्ही. निंबाळकर उपस्थित होते.सध्या केंद्र शासनाचे धोरण वातावरण बदलाच्या होणाऱ्या परिणामांबाबत गांभीर्याने विचार करणारे असून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाची दररोज माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी सध्या २५ संस्था संयुक्तपणे कार्यरत असल्याचे डेप्यु. डायरेक्टर डॉ. एन. चटोपाध्याय यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.बी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गीतांजली नेवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी डोईफोडे, वसंतलाल शहा (पाचवडकर), राधाकृष्ण तेली, जे.एच. गरवालीया, मिस्त्री, हेमंत रानडे, भोजराज नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कृषीविषयक मार्गदर्शनही हवेशेती उत्पादन वाढीसाठी दीर्घमुदतीचा हवामान विषयक अंदाज उपयुक्त ठरत नाही, त्यासाठी त्या-त्या परिसरातील हवामानविषयक दैनंदिन अंदाज व माहिती शेतकऱ्याला हवामानविषयक अंदाजाबरोबरच कृषी खात्याने कोणती पिके घ्यावीत, त्यासाठी घ्यावयाची विशेष दक्षता याबाबतही हवामान अंदाजाचा विचार करून योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.