शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:08 IST

इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

ठळक मुद्दे ‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक५० हजार डिपॉझिट भरा मगच अंडी खरेदी, दुसऱ्या कंपन्यांचा पवित्रा

कोल्हापूर : इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.कडकनाथ पक्षी पालक शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दीड हजार शेतकरी यामध्ये अडकले असून, त्यांची सुमारे आठ ते १0 कोटींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सोमवारी जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये एकत्रित आले. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यानुसार शेतकरी करवीर पोलीस ठाण्यात गेले; पण कंपनी इस्लामपूरची असल्याने येथे गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले.

येत्या दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, तहसीलदार व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.दरम्यान, ‘महारयत’चे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे सोशल मीडियावरून आवाहन केले होते. शेतकऱ्यांकडील अंडी व पक्षी सांगली व बेळगाव येथील कंपनी खरेदी करेल. असेही त्यांनी सांगितले होते; पण संबंधित कंपन्यांनी अगोदर एक लाख रुपये डिपॉझिट भरा, मगच माल खरेदी केले जाईल.

आठ ते १0 रुपयांनी अंडी खरेदी करण्याची तयारी त्या कंपन्यांनी दाखविल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांनी ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते भोगावती येथे कार्यक्रमानिमित्त असल्याने भेट होऊ शकली नाही.

फायदा नको, मुद्दल तेवढी द्याअनेक शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून प्लॅन्ट उभे केले आहेत. लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने ते हवालदिल झाले असून, आम्हाला फायदा नको; पण मुद्दल तेवढी द्या, अशी मागणी ते करू लागले आहेत.

गळ्यातील दागिने विकून अडीच लाखांचा पक्षी प्लॅन्ट उभा केला. कंपनी आता पक्षीही घेऊन जाईना, त्यात कोंबड्यांना औषधोपचार नसल्याने त्यांना मर लागल्याने दुहेरी संकट आमच्यासमोर आहे.- पद्मावती जयवंत भोसले, कसबा बावडा

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर