संदीप आडनाईककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा मधमाश्या पालनास पूरक आहेत. खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हा मधमाश्या पालन व्यवसाय एक प्रमुख उद्योग व्हावा, या दृष्टीने विविध योजना राबवत आहेत. मधाचे गाव पाटगाव हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प त्याला अपवाद नाही. जिल्ह्यातील शेतकरी आता या नव्या मधमाश्या पालनाकडे वळले आहेत. या व्यवसायातून आर्थिक भरभराट होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवन मधुर होण्यासाठी मदत होत आहे.मधमाश्या पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाकडून सह्याद्रीच्या रांगांमधील कोल्हापूर जिल्ह्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील १२ही तालुक्यांतील मधपाळ शेतकरी सातेरी मधमाश्यापालन करून सेंद्रिय आणि शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलन करत आहेत.
- ३८०० मधपेट्या कार्यरत
- १२ तालुके
- ९६ गावे
- ४११ मधपाळ
- ३८०० कार्यरत मधपेट्या
- २०,००० किलो मध संकलन (सातेरी मधमाश्यांपासून)
- १४,००० किलो मध संकलन (आग्या मधमाश्यांपासून)
- ३४००० किलो डिसेंबरअखेर एकूण मध संकलन
गाव तालुका प्रशिक्षणार्थी
- पाटगाव (भुदरगड) २६
- दाजीपूर (राधानगरी) २३
- मांडेदुुर्ग (चंदगड) १४
- एकूण तालुके ३
- एकूण प्रशिक्षणार्थी ६३
‘मधाचे गाव पाटगाव’मध उद्योगाच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील पाटगावला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नाबार्डच्या सहकार्यातून ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’ स्थापन केली आहे. या माध्यमातून मध निर्मिती प्रक्रिया व विक्री उद्योग, मधाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग होत आहे.
जिल्ह्यातील ३४ हजार किलो मध हा मधपेट्यांमधून जमा झालेला आहे. स्थानिक बाजारपेठेत मध विकून शिल्लक राहिलेला किंवा विकला न गेलेला मध खादी ग्रामोद्योग विकत घेतो आणि महाबळेश्वर येथील केंद्रात पाठवला जातो. त्यातूनही शेतकऱ्यांना फायदा होतो. -श्रीकांत जौंजाळ, जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी, कोल्हापूर.