शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी प्लॅन’साठी शेतकऱ्यांचे हेलपाट

By admin | Updated: November 23, 2014 23:52 IST

बीएसएनएलकडून अडवणूक : कार्ड नको म्हणण्याची वेळ; असून अडचड नसून खोळंबो

कोल्हापूर : कृषी विभाग आणि भारतीय दूरसंचार निगम यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांमध्ये व कृषी अधिकारी, कर्मचारी यांच्यात संवाद वाढावा, यासाठी ‘कृषी प्लॅन’चे सीमकार्ड देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र, कार्ड घेण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. विविध कारणांमुळे सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची सतवणूक केली जात आहे. या साऱ्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता ‘कृषी प्लॅन’ कार्ड नको रे बाबा...’ असे म्हणण्यापर्यंत गेली आहे.या योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांनी घेतला. मात्र, आता प्लॅनमध्ये मोबाईल क्रमांक घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. शेतकऱ्याला कसे कार्ड देता येईल, याचा विचार न करता ’क्युरी’ काढून कसे परत पाठविता येईल, याकडे ‘बीएसएनएल’च्या सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कल वाढला आहे. विशेषत: गडहिंग्लज आणि ताराबाई पार्कमधील ‘बीएसएनएल’ कार्यालयातील सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्यास लावले जात आहेत. रहिवाशासाठीच्या पुराव्याचा झेरॉक्सवरील फोटो चांगला आलेला नाही, ओळखत नाही, अशी किरकोळ कारणे सांगून अडवणूक केली जात आहे. झेरॉक्सवरील फोटो स्पष्ट आला आहे की नाही, हे सेवा केेंद्रातील कर्मचारी ठरवत असतो. त्याला वाटलं तर स्पष्ट फोटो नाही तर अस्पष्ट, असे सांगून परत पाठवतो. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास लावले जात असल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘बीएसएनएल’ एका बाजूला विविध योजना राबवत आहे, तर दुसरीकडे कार्ड घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची हेटाळणी केली जात आहे. आपुलकीची वागणूक न देता उद्धटपणाची वागणूक देऊन ‘कृषी प्लॅन’पासून संबंधित शेतकऱ्याला कसे वंचित ठेवता येईल, याकडे लक्ष देत असल्याचा आरोप होत आहे.संवाद वाढविण्यासाठी !शेती विभागातील कर्मचारी, अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये संवाद वाढावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी ‘बीएसएनएल’ आणि कृषी विभाग यांनी संयुक्तपणे ‘कृषीप्लॅन’ ही योजना सुरू केली. या प्लॅनमध्ये घेतलेल्या क्रमांकावर मोफत बोलण्यासह काही लाभ मिळतात. यासाठी शेतकरी असणे बंधनकारक आहे.‘कृषी प्लॅन’ घेण्यास गेल्यानंतर शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागत असून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. त्यामुळे ‘बीएसएनएल’ने कारभारात सुधारणा करावी. सेवा केंद्रातील त्रास सुरू राहिल्यास शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जाब विचारला जाईल.- सुधीर कानडे, शेतकरी, दुंडगे (ता. गडहिंग्लज)सेवा केंद्रातील तक्रारींसंबंधी कार्यालयातील वरिष्ठांकडे तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. ‘ट्राय’च्या सूचनेनुसार शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेतली जातात.- मंशाराम रावत, महाप्रबंधक, बीएसएनएल.