शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारला धडकी भरेल--शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:52 IST

\पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही,

ठळक मुद्दे कर्नाटकातील सभेला प्रचंड प्रतिसादअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय

पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले,‘नंजूम गौडा, नारायण स्वामी, शरद जोशी, महेंद्रसिंग टिकैत यांच्या उंचीचे देशात शेतकरी नेते आता राहिले नाहीत; परंतु शेतकºयांचे प्रश्न मात्र बिकट झाले आहेत. शेतकºयांबरोबरच शेतकºयांची मुलं-बाळेही आत्महत्या करू लागले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकºयांनी आणि शेतकरी नेत्यांनी एक होणे ही काळाची गरज आहे. मोदींच्या विश्वासघाताने शेतकरी पेटून उठला आहे तर शिवराजसिंह चौहान सरकारने सहा शेतकºयांचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशातील शेतकरी नेते एक झाले आहेत आणि त्यातूनच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय झाला. देशाच्या कानाकोपºयातील शेतकºयांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे.’

या देशातला शेतकºयांमध्ये भिकाºयाला राजा करण्याची जशी ताकत आहे तशीच राजाला भिकारी करण्याचीही ताकत आहे हे कोणी विसरू नये. आपली लढाई ही कौरवांच्या विरोधातली आहे म्हणूनच येत्या २० नोव्हेंबरला कुरूक्षेत्राला म्हणजेच दिल्लीला देशाच्या कानाकोपºयांतून शेतकरी निर्णायक लढ्यासाठी जमणार आहेत. कर्नाटकला शेतकरी चळवळीचा मोठा इतिहास आहे तेव्हा कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने आपली ताकद दिल्लीत दाखवा, असेही आवाहन खा. शेट्टी यांनी केले.कर्नाटकातील पांडवपुरा येथील किसान सभेत हजारो शेतकºयांसमोर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी.