शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

जिल्ह्यातील साखर कारखाने ‘एफआरपी’पासून दूरच

By admin | Updated: January 5, 2015 00:38 IST

इतरांकडे लक्ष : किसन वीर, प्रतापगडने फोडली ऊसदराची कोंडी

वाठारस्टेशन : केंद्र शासनाने यावर्षीचा गळित हंगामासाठी निश्चित केलेली ‘एफआरपी’ चौदा दिवसांत ऊस उत्पादकांना देणे कारखानदारांसाठी बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून गाळप उसाला अद्याप उचलही न देणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कारवाई सुरू केली आहे. किसन वीर, प्रतापगड या दोन कारखान्यांनी २,११२ रुपयांप्रमाणे ‘एफआरपी’ देण्याचे काम करत जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडण्याचे काम केले आहे. इतर कारखाने कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.यावर्षी जिल्ह्यातील गतवर्षीच्या गाळपाचा सरासरी साखर उताऱ्यानुसार सर्वाधिक एफआरपी २,३९३ रुपये जयवंत शुगर या कारखान्याची निघाली आहे. त्यांनी यापैकी १,९०० रुपये एफआरपी पोटी उचल दिली आहे. त्यामुळे अजून किमान ४९३ रुपये कारखान्याला १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहे.जिल्ह्यातील सर्वात कमी एफआरपीही नव्याने सुरू झालेल्या ग्रीन पॉवर शुगर वर्क्स गोपूज या कारखान्याची १,९७८ एवढी आहे. या कारखान्यानेही केवळ १,८०० रुपयांची उचल जाहीर केली. त्यामुळे उर्वरित १७८ रुपये प्रतिटन रक्कम या कारखान्याला शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. या दोन्ही कारखान्यांप्रमाणेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांची याच दरम्यान एफआरपी रक्कम निघत आहे. तर जिल्ह्यातील न्यू फलटण शुगर वर्क्स साखरवाडी व फलटण येथील श्रीराम या दोन कारखान्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नसल्याची माहिती मिळत आहे.या गाळप हंगामात आतापर्यंत वीस लाख क्विंटल साखरनिर्मिती जिल्ह्यातील कारखान्यातून झाली आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सध्याच्या साखर दराच्या ८५ टक्के रकमेतून इतर खर्च वजा करता कारखान्यांच्या हातात एक क्विंटल पोत्यापोटी केवळ १,४०५ रुपये राहत आहेत. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे.जिल्ह्यात पहिल्यांदा एफआरपी जाहीर करून किसन वीर, प्रतापगड या कारखान्यांनी ऊसदराची कोंडी फोडली असली तरी इतर कारखान्यांच्या भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे. (वार्ताहर)जिल्ह्यातील साखर कारखान्यांची एफआरपीनावएफआरपी रक्कमदिलेली उचलदेय रक्कमअजिंक्यतारा, सातारा२३४५१८००५४५लोकमान्य बाळासाहेब देसाई, पाटण २२९६१७००५९६किसन वीर, भुर्इंज२११२२११२-प्रतापगड२१०९२११२३ रुपये (जादा दिले)जरंडेश्वर२३२६१८००५२६कृष्णा२२७७१९००३७७सह्याद्री२२९९१९००३९९जयवंत शुगर२३९३१९००४९३ग्रीन पॉवर१९७८१८००१७८न्यू फलटण, साखरवाडी२१४९??श्रीराम फलटण२२०७??चौदा दिवसांत गाळप उसाला एफआरपी रक्कमही एकरकमी देण्याचा नियम आहे. परंतु, जर संबंधित कारखान्याने संचालक मंडळांने ठराव देऊन एफआरपी रकमेची उचल जाहीर करुन उर्वरित फरक पंधरा टक्के व्याजाने देण्याचे मान्य केले तर हे कारखाने कारवाईपासून वाचू शकतात. - पांडुरंग साठे, साखर संचालक, साखर संकुल पुणे