गडहिंग्लजची नाट्य चळवळ बळकट करण्यासाठी गडहिंग्लज नगर परिषद व गडहिंग्लज कला अकादमीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येथील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
अकादमीच्या हॉलमध्ये प्रयोगाचे सादरीकरण झाले. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित हे नाट्य आहे. जयसिंग पाटील यांनी लेखन केले आहे.
प्रा. शिवाजी पाटील यांनी दिग्दर्शन केले. या प्रयोगातून सद्य:स्थितीवर मार्मिकपणे भाष्य करण्यात आले आहे. प्रयोगाचा शहरातील रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आस्वाद घेतला.
याप्रसंगी अकादमीच्या अॅक्टिंग स्कूलमधील बाल कलाकारांनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्याविष्कार सादर केला. पुंडलिक परीट यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले ‘इतिहास पाठ करू नका, लक्षात ठेवा’ हे प्रहसन सादर करण्यात आले. बालकलाकारांनी सादर केलेल्या या लघुनाटिकेलाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
एकांकिकेमध्ये डॉ. संभाजी जगताप, विशाखा जोशी, रामय्या हिरेमठ, विशाल सुतार, आकाश हत्तरकी, मयंक कुरुंदवाडकर, अरुण पाटील, नीळकंठ मधुरा हराडे, वैशाली पाटील, राजश्री कोले, ऊर्मिला कदम, श्रुती माळगे कलाकारांनी भाग घेतला.
सारिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनायक कुलकर्णी यांनी रंगमंच व्यवस्थापन केले.
------------------------
* फोटो ओळी :
गडहिंग्लज येथे ‘बोले पोपट’ या एकांकिकेमध्ये कला सादर करताना कलाकार.
क्रमांक : २७०१२०२१-गड-०२