शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

रोषणाईच्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना पसंती

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

पर्यावरणपूरक दिवाळी : कमी आवाज, आकर्षक फटाक्यांचे अनेक पर्याय बाजारात

कोल्हापूर : दिवाळी आणि फटाके हे अतुट समीकरण आहे; पण यावेळी कोल्हापूरकरांनी हे समीकरण नव्या पद्धतीने कायम राखण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहेत. विविध सामाजिक संस्था, शाळांमध्ये केलेल्या ध्वनी, हवा प्रदूषणाबाबत केलेल्या जागृतीची जाणीव ठेवून त्यांच्याकडून मोठ्या आवाजाचे फटाके टाळून रोषणाई करणाऱ्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना पसंती दिली जात आहे.कोल्हापूर जिल्हा फटाके उत्पादक व विक्रेता संघटनेच्या माहितीनुसार जिल्ह्यात अधिकृत १२० उत्पादक व विक्रेते आणि तात्पुरत्या स्वरूपातील सुमारे १२०० लहान स्टॉलधारक दिवाळीसाठी सज्ज झाले आहेत. यावर्षी ध्वनी व हवा प्रदूषण टाळणाऱ्या फटाका खरेदीवर लोकांचा भर आहे. जाँईट, अ‍ॅटम बॉम्ब, एक हजार व पाच हजारच्या माळा अशा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी लॅटर्न बलून, डब्बल बार, चिटचॅट, भुईचक्कर, फुलबाजे, पाऊस, मल्टिशॉट अशा केवळ रंगीबेरंगी ‘फॅन्सी’ फटाक्यांना अधिक मागणी आहे. त्यात एरियल कलर आऊट, पाऊस, आदींचा समावेश आहे. शिवाय बिन आवाजाचे, कमी प्रदूषण करणारे; पण आकर्षक व रंगीबेरंगी रोषणाई करणारे १६ ते पाचशे शॉटस् फटाके २५० रुपयांपासून सात हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक दिवाळीच्या दिशेने कोल्हापूरकरांनी पाऊल टाकले आहे. दिवाळीत लोक पहिल्यांदा फराळ आणि कपड्यांना प्राधान्य देतात. त्यानंतर फटाक्यांकडे ते वळतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून फटाके खरेदीसाठी लोक येऊ लागले आहेत. येत्या दोन दिवसांत त्यांचे प्रमाण वाढेल. यंदा लोकांची रोषणाई करणाऱ्या ‘फॅन्सी’ फटाक्यांना अधिकतर पसंती आहे. दरात एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.- प्रकाश मिसाळ, फटाके विक्रेते