शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

विमानतळाच्या संरक्षक भिंतीची निविदा प्रसिद्ध

By admin | Updated: August 26, 2016 01:11 IST

१६ कोटींचे काम : १८ महिन्यांची मुदत

कोल्हापूर : जिल्ह्याच्या विकासातील केंद्रबिंदू ठरणाऱ्या उजळाईवाडी विमानतळाला आता चांगले दिवस येत आहेत. या विमानतळाला सेवासुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नुकताच मुंबईत करार झाला असतानाच गुरुवारी १६ कोटी रुपये खर्च करून विमानतळाभोवती संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. येत्या काही दिवसांत सुरू होणारे संरक्षक भिंतीचे काम १८ महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेऊन कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीसाठी ५० कोटी, तर संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी २० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. ही दोन्ही कामे मार्गी लागल्यास विमानतळ विकसनाची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात विमानसेवा सुरू होण्यातील महत्त्वाचे टप्पे पार पडतील, याकडे महाडिक यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी महिन्यात या कामांसाठीचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री राजू यांनी दोन्ही कामांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर केला. मंत्री राजू यांनी प्रशासकीय पातळीवर या कामाला गती दिली आणि प्रत्यक्ष निधीही उपलब्ध करून दिला. दोन्ही कामांपैकी संरक्षक भिंत बांधकामाची १६ कोटींची निविदा गुरुवारी प्रसिद्ध झाली. येत्या काही दिवसांत विमानतळाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होईल. त्यामुळे कोल्हापूरची विमानसेवा सुरू होण्यातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, असे खासदार महाडिक यांनी एका पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)