शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

kolhapur: शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आर. एम. मोहिते यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 12:31 IST

कोल्हापूर : शून्यातून विश्व निर्माण करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामचंद्र मारुती तथा आर. एम. मोहिते (वय ९१) यांचे ...

कोल्हापूर : शून्यातून विश्व निर्माण करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामचंद्र मारुती तथा आर. एम. मोहिते (वय ९१) यांचे गुरुवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी पंचगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ९ वाजता त्यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे.लौकिक अर्थाने त्यांचे शिक्षण कसेबसे तिसरीपर्यंतच झाले होते परंतु एखाद्या आयआयटीन्सला मागे सारेल इतके चांगले बांधकाम व्यवसायातील तांत्रिक आणि व्यवहार ज्ञान त्यांना होते. त्यामुळेच उद्योग, व्यवसायाचे एवढे साम्राज्य ते उभे करू शकले. पांढरा शुभ्र शर्ट, तसेच पांढरे पंजी आणि जगणेही लखलखीत असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.वयोमानानुसार गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या पश्चात उद्योजक दिलीप आणि शिवाजी ही दोन मुले, सुना, चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील अनेक सदस्य बाहेरगावी आहेत. ते सर्वजण आज शुक्रवारी सकाळपर्यंत कोल्हापुरात येणार आहेत. मोहिते यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी आमदार ऋतुराज पाटील, समरजित घाटगे, आनंद माने यांच्यासह उद्योजक, प्रशासनातील निवृत्त अधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांनी तातडीने मोहिते यांच्या घरी धाव घेतली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. एक सुखी, समाधानी समृद्ध आयुष्य ते जगले.

कोल्हापूर भूषण..मोहिते यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेने सन २००० साली माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मान केला होता. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने २०२२ साली त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विविध सामाजिक संस्थांनीही त्यांचा गौरव केला होता.

सामान्य कुटुंबात जडणघडण..कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावरील केर्ले हे त्यांचे गाव. याच गावात बहिणाबाई आणि मारुती व्यंकोजी मोहिते यांच्यापोटी १६ मार्च १९३४ रोजी मोहिते यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विहिरीला, रस्त्याला दगड पुरवणे, मोऱ्या बांधण्याची कामे करत होते. त्यामुळे साहजिकच आर. एम. यांनाही याच कामाकडे ओढा निर्माण झाला. त्यांनीही छोटी छोटी कामे घेण्यास सुरुवात केली. दर्जेदार काम आणि पडेल ते कष्ट करण्याची तयारी यामुळे साहजिकच शासकीय कामेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळू लागली. १९६२ ते १९७६ पर्यंतचा हा काळ मूलभूत विकासकामे करण्याचा असल्याने त्यांनी या काळात मोठी झेप घेतली.

पाटबंधारे प्रकल्पाची उभारणीरस्त्यांची आणि पुलांची कामे करता करता त्यांनी सांगली, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी केली. यातील खालापूर तालुक्यातील चौक येथील मोरवे प्रकल्पाची निविदा त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतून मिळवली होती. जिल्ह्यातील कासारी, चित्री, जंगमहट्टी प्रकल्प त्यांनी उभारले.

वस्त्रोद्योग, शिक्षणातही कार्यएकीकडे रस्ते, पाटबंधारे प्रकल्पांचे कामात जम बसल्यानंतर त्यांनी १९९५ साली मंगरायाचीवाडी ता. हातकणंगले येथे 'आर. एम. मोहिते टेक्सटाइल्स लि. ही सूतगिरणी सुरू केली. त्यातील यशानंतर 'अभिषेक कॉटस्पिन मिल लि., तामगाव' ही दुसरी सूतगिरणी सुरू केली. शिक्षणाविषयी आस्था असल्याने गावातील शिक्षण संस्थेची जबाबदारी त्यांनी घेतली. तसेच फोर्ट इंटरनॅशनल ही शिक्षणसंस्थाही त्यांनी स्थापन केली. शिवनेरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी सहकारातही काम केले. त्यांनी सुभद्रा लोकल एरिया बँकेचीही स्थापना केली होती.

अण्णा नावाने ओळख..मोहिते यांना सर्वजण ‘अण्णा’ म्हणत. करारी असलेले अण्णा सामाजिक कामात मात्र अग्रेसर. मात्र त्याची वाच्यता करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. शासनाच्या उपक्रमांना नेहमीच मोहिते यांची यंत्रणा हक्काने वापरली जायची. तर सामाजिक संस्थांच्या उपक्रमांनाही त्यांचे नेहमी पाठबळ असे.

रस्त्यांचे महत्त्वाचे कामकोकणासारख्या दुर्गम भागात घाटातील रस्ते तयार करण्याचे अवघड काम मोहिते यांनी पूर्ण केले. निनाईपरळ ते उदगिरी हा रस्ता आणि राजापूरजवळील पाचल ते जवळेतर हा सुमारे १७ कि. मी.चा घाट रस्ता तयार करण्याचे काम मोहिते यांना मिळाले होते. ट्रॅक्टर-ट्रॉली, रोलर, बुलडोझर यासारख्या साधनसामग्रीसह त्यांनी पूर्ण केलेल्या या रस्त्यांच्या कामांची आठवण आजही काढली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर