शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाणी कुटुंबाने केले हिंदू मुलीचे कन्यादान !

By admin | Updated: June 14, 2016 00:18 IST

विवाह सोहळा : भेडसगाव येथे हिंदू-मुस्लीम ऐक्याची प्रचिती

बाबासाहेब कदम --वारणा कापशी --सोशल मीडियाच्या माध्यमातून जात आणि धर्मांवर आधारित पोस्ट टाकण्यात आणि वाचण्यात काहींना आनंद मिळतो. परंतु भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील निवृत्त मुख्याध्यापक बाळ मुलाणी यांनी मात्र स्वत:च्या मुलीसारखे सांभाळलेल्या हिंदू मुलीचे कन्यादान करून आगळा आदर्श निर्माण केला आहे.सविस्तर वृत्त असे : हिंदू -मुस्लीम असा कोणताही भेदभाव न मानता सामाजिक उपक्रम जोपासणारे मुलाणी कुटुंब संपूर्ण गावाला परिचित. याच गावातील पाटबंधारे खात्यात नोकरी करणारे आकाराम शंकर पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून बेपत्ता आहेत. त्यांना दोन मुली असल्याने पालनपोषणाची जबाबदारी आई रेखा पाटील यांच्यावर होती. येईल त्या परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी रोजगार करत मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी मोठ्या हिमतीने सांभाळली. काळाच्या ओघात मोठी मुलगी संजीवनीचे लग्न झाले. परंतु लहान मुलगी नकुशीच्या शिक्षणाचा प्रश्न आईसमोर आ-वासून उभा होता. नकुशीला मुलाणी कुटुंबाच्या घरी ठेवून आई रोजगाराला निघून जायची. मुलाणी कुटुंबीयांना या मुलीचा एवढा लळा लागला की त्यांनी आपल्या मुलीचा दर्जा देऊन सुजाता असे नामकरण देखील केले. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपत सुजाताच्या शिक्षणासह तिच्या लग्नाची जबाबदारी आपल्या कुटुंबावर घेतली. कापशी (ता. शाहूवाडी) येथील भीमराव मामलेकर यांचा मुलगा रमेश मामलेकर यांच्याशी विवाह ठरला. स्वत:च्या दारात विवाह मंडप उभारून हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्नदेखील लावून दिले. मुस्लीम कुटुंबाने ग्रामीण भागात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. पत्नी हायातबी मुलाणी यांनी आईची तर सूरज मुलाणी याने भावाची भूमिका निभावत सुजाताचा लग्नसोहळा मोठ्या आनंदात पार पाडला. बिराज मुलाणी, जहॉँगीर मुलाणी यांच्यासह अनेक नातेवाईक उपस्थित होते.भेडसगाव (ता. शाहूवाडी) हिंदू समाजातील मुलगी सुजाता हिच्या विवाह सोहळ्यात कन्यादान करताना मुस्लीम दाम्पत्य बाळ मुलाणी, हायातबी मुलाणी.