शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडच्या दरात घसरण, आवक वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 14:10 IST

कलिंगडचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दरात एकदमच घसरण सुरू झाली आहे. घाऊक बाजारात ४ ते १० रुपये दर राहिला असून आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसत आहे.

ठळक मुद्देकलिंगडच्या दरात घसरण, आवक वाढल्याचा परिणाम घाऊक बाजारात ४ ते १६ रुपये नग

कोल्हापूर : कलिंगडचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना दरात एकदमच घसरण सुरू झाली आहे. घाऊक बाजारात ४ ते १० रुपये दर राहिला असून आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसत आहे.यंदा उन्हाचा तडाखा फेब्रुवारीपासूनच जाणवू लागला. त्यामुळे फळांच्या मागणीत वाढ होत गेली. आंब्याच्या अगोदर कलिंगडची आवक सुरू झाली आणि मागणीही त्या पटीत राहिली. परिणामी दर चांगला मिळत गेला. आता कलिंगडचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आंब्याची आवक वाढल्याने कलिंगडची मागणी घटली आहे.

यंदा एकही जोरदार वळीव पाऊस न झाल्याने हवेत कमालीचा उष्मा पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कलिंगडला शेवटपर्यंत मागणी राहणार म्हणून माढा, पंढरपूर, कर्नाटकातील शेतकरी कलिंगड घेऊन कोल्हापूरबाजार समितीत येत आहेत.

तापमानात वाढ होत चालल्याने कलिंगडच्या दरातही तेजी येईल, असा आशा शेतकऱ्यांनी होती; पण ग्राहकांचा प्रतिसादच मिळत नाही. सगळेजण आंबा खरेदीमध्ये गुंतल्याने कलिंगडकडे अक्षरश: पाठ फिरवल्यासारखीच अवस्था आहे.कोल्हापूर बाजार समितीत रोज हजाराहून अधिक कलिंगडांची आवक होते. सकाळी लिलावात ढीग लावले जातात. नगाच्या आकारानुसार ढीग लावले जातात. साधारणत: ५० ते ५०० रुपयांपर्यंत ढिगांची बोली होत आहे. सरासरी २०० रुपये ढिगाची किंमत होत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही.

उष्मा कायम असल्याने कलिंगडना चांगला दर मिळेल असे वाटत असल्याने गाडी भरून माल घेऊन आलो. पण येथे कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. कष्ट व वाहतूक खर्चाचा ताळमेळच बसत नाही.-औदुंबर रणदिवे (शेतकरी, भोसे-माढा)

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर