शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ब्याडगीच्या दरात घसरण, मागणीबरोबर आवकही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:11 IST

Market Kolhapur- ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ब्याडगी २८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फळमार्केटमध्ये माल्टा, बोरे, कलिंगडांची रेलचेल असून, द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.

ठळक मुद्देब्याडगीच्या दरात घसरण, मागणीबरोबर आवकही वाढली भाजीपाला मार्केट स्थिर : द्राक्षांच्या आवकेत वाढ

कोल्हापूर : ऐन हंगामाच्या तोंडावर मिरचीने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र या आठवड्यात दरात थोडी घसरण झाली असून किरकोळ बाजारात ब्याडगी २८० रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. फळमार्केटमध्ये माल्टा, बोरे, कलिंगडांची रेलचेल असून, द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.यंदा परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळीच्या झटक्याने मिरचीच्या पिकाला फटका बसला होता. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच मिरचीने ४०० रुपयांचा टप्पा गाठला होता. या आठवड्यात मात्र दरात हळूहळू घसरण होत असून किरकोळ बाजारात ब्याडगीचा दर २८० रुपये किलोपर्यंत आला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत आवक वाढल्याने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याच्या दरात चढउतार नाही. तीळ १५०, जिरे २००, खोबरे १८० रुपये किलो आहे. कोथिंबिरीची मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने वांगी, कोबी, टोमॅटोच्या दरांत मोठी घसरण पाहावयास मिळते. किरकोळ बाजारात २० तर कोबी दहा रुपये किलो आहे. टोमॅटोही दहा रुपये किलोपर्यंतच राहिला आहे. दोडका, वाल, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, घेवडा, ढब्बू या भाज्यांचे दर काहीसे स्थिर आहेत.फळबाजारामध्ये मोसंबी, माल्टा, संत्री, द्राक्षे, चिक्कू, सफरचंदांची रेलचेल पाहावयास मिळते. द्राक्षांची आवक थोडी वाढली असली तरी अद्याप ती हिरवट आहेत. द्राक्षे काहीसी आंबट लागत असल्याने मागणी कमी आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात तीस रूपये किलो दर आहे. कलिंगडांची आवक वाढू लागली आहे. काळ्या पाठीच्या कलिंगडांनी बाजार फुलला असून मागणीही चांगली आहे.डाळींच्या दरात वाढ दिसत नाही. हरभराडाळ ६५, तूरडाळ ११०, मूगडाळ १२०, भूग १००, मटकी १२० रुपये किलो आहे. शाबू ६०, तर साखर ३५ रुपयांवर स्थिर आहे.कांदा-बटाटा स्थिरबाजार समितीत रोज १६ हजार पिशव्या कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे दरात वाढ नसून घाऊक बाजारात सरासरी २५ रुपये कांदा आहे. बटाट्याचाही दरदाम स्थिर आहे. 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर