शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फरार पोलीस निरीक्षक सुभाष पन्हाळेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला त्याच्या राहत्या गावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली ...

ठळक मुद्देपांडव मृत्यूप्रकरण; कळंबा कारागृहात रवानगीपहाटे तीन वाजता त्याच्या घरी छापा टाकून त्याचा ताबा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला त्याच्या राहत्या गावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची सोमवारी कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून तेव्हापासून आरोपी पन्हाळे हा फरार होता.

अरुण पांडव (रा. शनिवार पेठ) याचा सन १९८५ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक पन्हाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सन २००७ मध्ये उच्च न्यायालयाने या गुन्ह्याच्या खटल्यामध्ये पन्हाळे याला सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्यावर त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या अपिलाचा निकाल सन २०१३ मध्ये लागला. त्यामध्ये न्यायालयाने त्याची ही शिक्षा कायम केली. आरोपी पन्हाळे फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा ठावठिकाणा माहीत नसल्याने पोलिसांना शोध घेण्यास अडचणी येत आहेत. त्याच्या वास्तव्याची माहिती कोणाला असल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केले होते.

दरम्यान, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना रविवारी निनावी फोनद्वारे पन्हाळे हा बिबवेवाडी येथे आल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक रवाना केले. पहाटे तीन वाजता त्याच्या घरी छापा टाकून त्याचा ताबा घेतला. तेथून त्याला थेट कारागृहात पाठविले.