शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्वास’ कारखाना इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सरूड : विश्वासराव नाईक साखर कारखान्यात उसाच्या रसापासून प्रतिदिन १ लाख लिटर इथेनॉल तयार करणारा प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सरूड :

विश्वासराव नाईक साखर कारखान्यात

उसाच्या रसापासून प्रतिदिन १ लाख लिटर इथेनॉल तयार करणारा प्रकल्प कार्यान्वित करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

चिखली (ता. शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरूडकर हे प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

आमदार नाईक पुढे म्हणाले, येत्या गळीत हंगामात पूरपट्ट्यातील ऊस प्राधान्याने उचलण्यासाठी कारखान्याच्या वतीने विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. भविष्यात पुराच्या पाण्याने कमी हानी होणारे ऊस बियाणे विकसित करण्याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला विनंती करण्यात आली आहे. पुढील गळीत हंगामात कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येणार असून कारखाना प्रतिदिन ६ हजार मे. टन क्षमतेने गाळप करेल.

केंद्र सरकार दरवर्षी उसाची किंमत वाढवत आहे, त्याबरोबर साखरेच्याही किमती वाढवणे गरजेचे आहे. सर्जेरावदादा नाईक बँकेत ज्या शेतकऱ्यांचे, वाहतूकदार व ठेवीदारांचे पैसे आहेत ते निश्चित परत मिळतील. यासाठी खातेदारांनी पैसे मागणीसाठी बँकेकडे अर्ज करावेत.

सभेस अमरसिंह नाईक, विराज नाईक, सुनीतादेवी नाईक, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, अश्विनीताई नाईक, आदींसह सर्व संचालक व मोजके सभासद, खातेप्रमुख उपस्थित होते.

फोटो ओळी :

चिखली येथे विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सभेत आमदार मानसिंगराव नाईक यांनी संबोधित केले. यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरूडकर, मान्यवर उपस्थित होते.