शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘फेअरडील’ची भरपाई महापालिकेला अमान्य, दाद मागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:21 IST

जकात वसुलीचा ठेका घेतलेल्या फेअरडील कन्स्ट्रक्शन कंपनीची २४ कोटी नुकसानभरपाईची मागणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अमान्य केली असून, या संदर्भात यापूर्वी दिलेल्या लवाद न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्यासमोर स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘फेअरडील’ची भरपाई महापालिकेला अमान्यदाद मागणार : नगरविकास मंत्र्यांसमोर केले स्पष्ट

कोल्हापूर : जकात वसुलीचा ठेका घेतलेल्या फेअरडील कन्स्ट्रक्शन कंपनीची २४ कोटी नुकसानभरपाईची मागणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने अमान्य केली असून, या संदर्भात यापूर्वी दिलेल्या लवाद न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्यासमोर स्पष्ट केले.महानगरपालिका आणि फेअरडील कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात जकातीच्या ठेक्यातील नुकसानभरपाई देण्यावरून वाद सुरू असून, या संदर्भात गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या कक्षात उभय बाजूंच्या संबंधितांची बैठक झाली. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, एलबीटी अधिकारी सुनील बिद्रे, तर फेअरडीलतर्फे के. एन. ज्योतिंद्रन तसेच त्यांचे वकील उपस्थित होते.या बैठकीत राज्यमंत्री योगेश सागर यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. दोन्ही बाजूंनी आपापली बाजू मांडून त्यावर ते ठाम राहिले. महापालिकेने या प्रकरणाची सविस्तर टिपणीच मंत्र्यांना सादर केली. त्यामध्ये सगळा घटनाक्रम दिला आहे. फेअरडीलच्या प्रतिनिधींनी आपली नुकसानभरपाईची रक्कम लवादाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेने द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी आपणास अमान्य असून, त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असून त्यासंबंधीची कार्यवाही सुरू असल्याचे महापालिकेने सांगितले. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राज्यमंत्री योगेश सागर यांनी पुन्हा दहा-बारा दिवसांनी बैठक घेतली जाईल, असे सांगितले.महानगरपालिकेचा जकात वसुलीचा ठेका फेअरडील कंपनीने घेतला होता; परंतु पहिल्या दिवसापासून त्यांनी कराराचे उल्लंघन केले. जकातीच्या ठेक्याची ठरलेली २५ कोटी ०९ लाखांची रक्कम समान ५२ आठवड्यांत द्यायची होती. पहिले २२ हप्ते नियमित देणे बंधनकारक होते. मात्र कंपनीने केवळ सहाच हप्ते नियमित दिले. त्यानंतर मात्र त्यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. त्यामुळे कराराचा भंग केला असा ठपका ठेवून महापालिकेने जकात ठेका रद्द केला. त्याविरुद्ध ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांच्याविरोधात निकाल गेला. त्यानंतर त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात दावा केला. तेव्हा न्यायालयाच्या निर्देशानुसार एस. एन. वरिआव्वा लवाद नेमण्यात आला.

या लवादाने १८ कोटी ८० लाख रुपयांची तडजोडीची रक्कम निश्चित करून तोडगा काढण्याची सूचना केली होती. मात्र महापालिकेने ती अमान्य केली. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे दोन बैठका झाल्या. त्यावेळी इतकी रक्कम कशी झाली, याबाबतचे लेखी स्पष्टीकरण महापालिकेने मागितले. मात्र ते देण्यास ठेकेदाराने नकार दिला. पुढे ठेकेदाराने पुन्हा लवादाकडे धाव घेतली. तेव्हा लवादाने २४ कोटी ०६ लाख रुपये भरपाई तसेच जोपर्यंत पूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत १८ टक्के व्याजदर सुरू राहील असे सांगितले. मात्र महापालिकेने ते आजतागायत अमान्य केले आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर