शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च टाकण्यावर गडबड, महापालिकेने दहा कोटींची बिले भागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 11:43 IST

आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी मिळालेला निधी खर्च टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३० कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या; तर ठेकेदारांची सुमारे १० कोटींची बिले भागविण्यात आली. अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर सगळे लक्ष केंद्रित केले असून गुरुवारीही वसुलीचा एक कोटींचा टप्पा पूर्ण केला.

ठळक मुद्देनिधी खर्च टाकण्यावर गडबड, महापालिकेने दहा कोटींची बिले भागविलीअनेक कामांच्या वर्क आॅर्डर

कोल्हापूर : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असताना महापालिका प्रशासनातील अधिकारी मिळालेला निधी खर्च टाकण्याच्या कामात गुंतले आहेत. गेल्या आठ दिवसांत तब्बल ३० कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आल्या; तर ठेकेदारांची सुमारे १० कोटींची बिले भागविण्यात आली. अधिकाऱ्यांनी आता वसुलीवर सगळे लक्ष केंद्रित केले असून गुरुवारीही वसुलीचा एक कोटींचा टप्पा पूर्ण केला.सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील शेवटचे दोन दिवस बाकी राहिले आहेत. या दोन दिवसांत वसुली आणि देणी भागविण्यावर महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जोर दिला आहे. ठेकेदारांची बिले वेळेत मिळत नाहीत, अशी तक्रार नेहमी होत असते; पण गेल्या आठ दिवसांत तब्बल दहा कोटींची बिले भागविली गेली. सध्या सुरू असलेल्या ‘नगरोत्थान’मधील कामे संपविण्याचा प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केला; परंतु त्यातील एक काम अपूर्ण राहिले आहे.सन २०१७-१८ या सालातील नगरोत्थानची अडीच कोटींची कामे अपूर्ण कामात टाकून ती पुढील वर्षी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या ८० लाखांचा विशेष निधी मात्र यापूर्वीच खर्ची टाकण्यात आला. तसेच ही कामेही पूर्ण करून घेण्यात आल्याचे सार्वजनिक विभागातून सांगण्यात आले. यावर्षी राज्य सरकारकडून फारसा निधी मिळाला नाही. त्यामुळे नवीन कामांची प्रक्रिया राबविली नाही.महापालिका स्वनिधीतून महसुली व भांडवली जमेतून करण्यात येणाऱ्या ३० हून अधिक कामांच्या वर्क आॅर्डर देण्यात आलेल्या आहेत. पॅचवर्कची कामे आधी करण्यात आली. त्यानंतर ऐच्छिक तसेच पदाधिकाऱ्यांचा निधी अशा टप्प्याने ही कामे केली जातात.महसुली तसेच भांडवली जमेचा हिशेब ३१ मार्चपर्यंत होत राहतो. त्यामुळे जरी कामे या हेडमधून धरली असली तरी ती मार्चपर्यंत पूर्ण होत नाहीत. म्हणून अपूर्ण कामे या हेडखाली धरून ती पुढील वर्षात करण्याची महापालिकेत प्रथा आहे.नागरी सुविधा केंद्रात गर्दीआर्थिक वर्ष संपण्यास दोन दिवस राहिले असल्याने घरफाळा, पाणी बिले भरण्यास नागरी सुविधा केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. रोज सरासरी एक ते सव्वा कोटीची वसुली होत आहे. गुरुवारीही नागरिकांची गर्दी कायम होती. सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या केंद्राची वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली आहे; तर रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही केंद्रे सुरू राहणार आहेत. गुरुवारी जवळपास एक कोटीची जमा झाल्याचे सांगण्यात आले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर