शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राधिकरण’ विकासाची वाट बिकटच गेली पंधरा महिने आश्वासनेच : नागरिकांचा विश्वास संपादण्यात अधिकारी अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:16 IST

कोल्हापूर शहरानजीकच्या ४२ गावांना एकत्र करून राज्य शासनाने या गावांचा नियंत्रित विकास करण्यासाठी ‘कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन केले. निधीअभावी रिकाम्या असलेल्या या प्राधिकरणाची घोषणा

ठळक मुद्देगावांचा विश्वास संपादन करण्यास प्राधिकरण अद्याप यशस्वी झाले नसल्याने विकासाची नवी वाट निर्माण होण्याऐवजीइंचही खासगी जमीन घेणार नाही, ग्रामपंचायत किंवा महापालिकेला न झेपणारे प्रकल्प उभारले जातील, विकासशुल्क,

तानाजी पोवार ।कोल्हापूर शहरानजीकच्या ४२ गावांना एकत्र करून राज्य शासनाने या गावांचा नियंत्रित विकास करण्यासाठी ‘कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन केले. निधीअभावी रिकाम्या असलेल्या या प्राधिकरणाची घोषणा होऊन सुमारे १५ महिन्यांचा कालावधी उलटला तरीही हे ‘प्राधिकरण’ अद्याप आश्वासनांच्या गर्तेतच अडकले आहे. गावांचा विश्वास संपादन करण्यास प्राधिकरण अद्याप यशस्वी झाले नसल्याने विकासाची नवी वाट निर्माण होण्याऐवजी ती बिकटच होत आहे.

प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर नियमावली आणि कार्यक्षेत्राबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली, प्राधिकरण कसे फायद्याचे हे ग्रामीण जनतेला पटवून देण्यास अधिकाऱ्यांनी विलंब लावल्याने गैरसमज वाढले. ‘प्राधिकरणा’च्या माध्यमातून गावठाणाबाहेरचा विकास प्राधिकरण नियंत्रित होईल, गावठाणाबाहेरील घरफाळाही ग्रामपंचायतीकडेच जमा होईल, इंचही खासगी जमीन घेणार नाही, ग्रामपंचायत किंवा महापालिकेला न झेपणारे प्रकल्प उभारले जातील, विकासशुल्क, सरकारी जमिनीच्या माध्यमातून निधी उभारणी आणि शासन निधी या माध्यमातून निधी उभारला जाईल, आदी आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी प्राधिकरणातील गावांना दिली, पण ‘ग्रामपंचायतीचे अधिकार आणि गावातील जमिनीवरील आरक्षण’ या मुद्द्यावर गावांनी हे प्राधिकरण नकोच असा पावित्रा घेतला आहे.कर्मचारी भरतीचीही घोषणाचफक्त पाचच कर्मचाºयांवर हे ‘प्राधिकरणा’चे कामकाज सुरू आहे, पालकमंत्री पाटील यांनी आकृतीबंध कर्मचारी भरतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात कार्यवाही शून्यच आहे. 

प्राधिकरणात अनेकांच्या जमिनी जाणार आहेत, त्यामुळे तूर्त तरी या प्राधिकरणाला स्थगिती मिळावी, ‘प्राधिकरण’ची जनसुनावणी घ्यावी, मगच त्याबाबत निर्णय घ्यावा.- राजू सूर्यवंशी, सभापती, करवीर पंचायत समिती‘प्राधिकरण’ हे केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पालकमंत्र्यांनी निर्माण केले आहे, त्यातून शेतकºयांचे नुकसानच आहे, त्यामुळे आमचा विरोध कायम आहे.- प्रा. बी. जी. मांगले, निमंत्रक, प्राधिकरण विरोधी कृती समितीगेल्या महिन्यात सरपंच, ग्रामसेवकांच्या बैठकीत ग्रामस्थांची मानसिकता बदलत असल्याचे दिसून आले, त्यामुळे पुढील आठवड्यात कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.- शिवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर