शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

कारखान्यांचा करणार सर्व्हे

By admin | Updated: April 2, 2015 01:24 IST

पंचगंगा प्रदूषण : १५ दिवसांची मुदत; संयुक्त बैठकीत निर्णय

कोल्हापूर : पंचतारांकित, गोकुळ शिरगाव यासह सर्वच औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जाते किंवा नाही याची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी येत्या १५ दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास मंडळ यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्व्हे करण्याचा निर्णय झाला. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. पंचगंगा प्रदूषणास औद्योगिक वसाहतीमधील दूषित व सांडपाणी कारणीभूत असल्याचा अनेक सामाजिक संघटना व स्वाभिमानी युवा आघाडीचा आरोप आहे. दबावाला बळी पडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना प्रदूषणचे अधिकारी पाठीशी घालत आहेत, असाही मुद्दा चर्चेत आला. किती उद्योगांकडे घरगुती आणि औद्योगिकीकरणासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत, याची माहिती द्यावी, अशी मागणी पर्यावरणवादी उदय गायकवाड यांनी केली. नेमकेपणाने माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नसल्याचे समोर आले. त्यामुळे सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष बंडू पाटील यांनी तेरदाळ बंधाऱ्यावरील आणलेले दूषित पाण्याची बाटली दाखविली. ते म्हणाले, अतिशय दूषित पाणी शिरोळ तालुक्यातील लोकांना प्यावे लागत आहे. प्रदूषणकारी घटकांवर थेट कारवाई करावी, केवळ कागदोपत्री उत्तर देऊ नये. ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, अधिकाऱ्यांनी बैठकीत आश्वासन देऊन न जाता कारवाईचे बोलावे. पंचगंगा प्रदूषणावरील याचिकाकर्ते सदा मलाबादे म्हणाले, कारवाईसंबंधी अधिकाऱ्यांनी ठोस असे काही करणार नसतील तर बैठकांना काहीही अर्थ नाही. बैठकीस प्रसाद धर्माधिकारी, के. एस. भांडेकर, डी. टी. भांडेकर यांची विविध सूचना केल्या. यावेळी वैभव कांबळे, शिवाजी माने, बंडू बरगाले, धनंजय शेंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिका आयुक्तांची वेळ घेऊन बैठककोल्हापूर शहरातील बारा ओढ्यांतून सांड व मैलामिश्रीत पाणी पंचगंगा नदीत थेट जावून मिसळत आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांची वेळ घेऊन स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला. शिवसेनेचे विजय देवणे यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यांवर महानगरपालिका गंभीर नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कोणाची रँक किती मोठी आणि लहान यांचा विचार न करता प्रांताधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठकीस पुढाकार घ्यावा, अशीही मागणी केली.