शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

मंंदिर परिसरात सुविधांची वाणवा

By admin | Updated: February 7, 2015 00:05 IST

पर्यटकांची गैरसोय : मंदिराला अतिक्रमणाचा विळखा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव

कोल्हापूर : ‘शहराचे हृदय’ म्हणून ज्या प्रभागाची ओळख सांगता येईल त्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात सध्या सगळ््यात मोठा प्रश्न आहे तो येथे येणाऱ्या भाविकांना न मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा. महापालिकेकडील निधीची कमतरता आणि शासनपातळीवर मंदिराच्या विकासाबाबतची उदासीनता, ठेकेदारांची अनुपलब्धता यामुळे परिसरात स्वच्छतागृहे नाहीत. महाद्वार रोड, जोतिबा रोडसारख्या रस्त्यांची चाळण झाली आहे. महालक्ष्मी मंदिर या प्रभागात बालगोपाल तालीम, शेषनारायण मंदिर, बाबूजमाल दर्गा परिसर, गंगावेश, अर्बन बँकेची मागील बाजू, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, भेंडे गल्ली, कासार गल्ली, महादेव गल्ली, परीट गल्ली असा भरवस्तीचा परिसर येतो. साधारण साडेसहा हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागाचे गेली १५ वर्षे परमार कुटुंबीय नेतृत्व करत आहेत. सध्या रणजित परमार हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी नयना परमार व भाऊ ईश्वर परमार यांनी देखील या प्रभागाचे नगरसेवकपद पाहिले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा परमार कुटुंबावर विश्वास आहे. मध्यवस्ती परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. रहिवासी तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्गदेखील आहे. व्यापारीवर्गापेक्षा रहिवासी वस्तीतील नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे अधिक लक्ष पुरविण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचा, ड्रेनेजचा किंवा गटारींचा प्रश्न नाही, कारण ही कामे झाली आहेत. येथे प्रश्न येतो तो रस्त्यांचा आणि बाहेरील भाविकांच्या सोयी-सुविधांचा. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराभोवती अतिक्रमणांना विळखा असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो. पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे नाहीत, घाटी दरवाजा परिसरात अस्वच्छता, इंदुमती गर्ल्स हायस्कूलसमोर असणाऱ्या स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे, हे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. अंबाबाईचा रथोत्सव, नगरप्रदक्षिणा हेच अडथळे पार करत निघते. मात्र, मंदिराशी निगडित विषय महापालिकेच्या मुख्य प्रशासन पातळीवर होत असल्याने नगरसेवकांना त्यात फारसा वाव नाही. महापालिका पातळीवर या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, शिवाय ठेकेदारांमधील उदासीनतेमुळे मंजूर झालेली कामेही रखडली आहेत. मंजूर कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. कोणतेही पद नसताना केलेल्या कामांमुळे गेली १५ वर्षे नागरिकांनी परमार कुटुंबावर विश्वास टाकला आहे. प्रभागात अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा नाहीत. त्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत, मात्र ठेकेदारांमध्ये उदासीनता असल्याने काम रखडले आहे. - रणजित परमार (नगरसेवक)