कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये डोळ्याची साथ आली असून एकूण ४,७८७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून ही साथ सुरू असून यामध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हातकणंगले तालुक्यात नोंदवण्यात आलेले आहेत. ही संख्या २०७३ असून शिरोळ तालुक्यात १७४१ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे.या आजारातून आतापर्यंत १८१७ रुग्ण बरे झाले आहेत. नागरिकांनी डोळ्याची साथ आल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, हात वारंवार धुवावेत, डोळे चोळू नयेत, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत असे आवाहन प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी केले आहे. ही साथ सुरू असली तरी अजूनही लहान मुलांच्यामध्ये याचे प्रमाण कमी असल्यामुळे शाळांच्या उपस्थितीवर याचा परिणाम जाणवत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात डोळ्याची साथ, 'इतके' रुग्ण; अशी घ्या काळजी
By समीर देशपांडे | Updated: August 10, 2023 16:34 IST