शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर हवा नियोजनाचा उतारा

By admin | Updated: March 8, 2016 00:44 IST

इचलकरंजीतील प्रश्न : नदीवेस चौकात आंदोलन; नव्या वसाहतींसाठी टँकरची मागणी

इचलकरंजी : पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असताना शहरात विविध ठिकाणी होणारी आंदोलने पाहता नियोजनाच्या अभावाबरोबरच गांभीर्य नसल्याचे निदर्शनात येत आहे. पाण्याच्या आणीबाणीवर मात करण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनेतून सोडले जाणारे पाणी आणि कूपनलिकांच्या पाणी उपशावरही नियंत्रण होणे गरजेचे आहे. शहरातील नव्याने वाढलेल्या सहारानगर, शहापूर यासारख्या वसाहतींमध्ये जून महिन्यापर्यंत टॅँकरने नियमित पाणी पुरवठा होण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.इचलकरंजीस कृष्णा व पंचगंगा नद्यातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासून बंद होते. त्यामुळे कृष्णा नदीतूनच मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यापर्यंत कृष्णा नदीवरच अवलंबून राहावे लागते. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदीतील पात्र फेब्रुवारी अखेरपासूनच कोरडे पडू लागले आहे. मजरेवाडी जॅकवेलच्या इंटकवेलमधील रोझ व्हॉल्व्ह रिकामी पडल्यामुळे इचलकरंजीतील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना कूपनलिकांच्या पाण्यावरच गुजरण करावी लागते.दरम्यानच्या काळात आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून चांदोली व त्यानंतर म्हैसाळ बंधाऱ्यातील पाणी राजापूर बंधाऱ्यामध्ये सोडण्यास सांगितले. राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. तरीही पूर्वी दोन किंवा तीन दिवसांतून मिळणारे नळाचे पाणी आता चार आणि पाच दिवसांनी मिळत आहे.शहरात बहुतांश ठिकाणी कमी दाबाचा आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी संतप्त नागरिक रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चा अशी आंदोलने करीत आहेत. सोमवारीही शहरातील गावभागामधील आंबी गल्ली, नदीवेस नाका, गुजरी पेठ कॉर्नर, जगताप तालीम परिसर अशा व्यापक भागांमध्ये अनियमित, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक संजय तेलनाडे, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक अहमद मुजावर, पापालाल मुजावर, आदींच्या नेतृत्वाखाली नदीवेस-मरगुबाई मंदिर चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांना सामोरे जाणाऱ्या नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना विशेषत: महिला नागरिकांनी पाणी टंचाई व त्याबाबत होणारी अनियमितता याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. पाणी टंचाई संपेपर्यंत जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना इचलकरंजीतच थांबण्यास सांगण्याविषयी नागरिकांनी सांगितले. यावर प्रज्ञा पोतदार यांनी, जलअभियंता जकीनकर मंगळवारी संबंधित भागांची पाहणी करतील आणि त्यांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)पेयजल प्रकल्प सुरू ठेवाशहरात जनता बॅँक, आयको स्पिन, नवमहाराष्ट्र सूतगिरणी यांनी विविध ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू केले आहेत. अकरा ठिकाणी असलेल्या या प्रकल्पांना उन्हाळ्यात नेहमीच गर्दी होते. मात्र, पाणी टंचाईच्या काळात यापैकी पाच-सहा प्रकल्प पाण्याअभावी बंद पडतात. त्यावेळी प्रकल्पांना सातत्याने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. शहरातील सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती-विश्वस्त यांनीही नवीन प्रकल्प उभारून ते ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवावेत, अशी मागणी होत आहे.