शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘सीपीआर’ प्रसूती विभागावर ग्रामीणचा जादा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:59 IST

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयावर (सीपीआर) ‘प्रसूती’चा अतिरिक्त ताण पडतो आहे. जिल्ह्यातील काही ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयावर (सीपीआर) ‘प्रसूती’चा अतिरिक्त ताण पडतो आहे. जिल्ह्यातील काही ग्रामीण रुग्णालये कर्मचाऱ्यांच्या किंवा औषधांच्या तुटवड्याचे कारण पुढे करून बाळंतीण व त्यांच्या नातेवाइकांना सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात सीपीआरमधील प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या नऊ महिन्यांत सिझेरियन व नॉर्मल मिळून ६३९२ प्रसूती झाल्या आहेत. त्यात ५० जुळी व एक तिळ्याचा समावेश आहे.सीपीआरमधील प्रसूती विभागात रोज सरासरी २५ ते ३० प्रसूती होतात. नॉर्मल, सिझर व गायनॅक असे तीन वॉर्ड असून, साधारणत: २५ परिचारिका तीन वेळेत असतात; पण आता सीपीआरवर बाहेरून येणाºया प्रसूतीचा अतिरिक्त ताण वाढतोय आहे. अपुरे मनुष्यबळ, बाळंतिणीला लागणाºया औषधांचा तुटवडा आणि कॉटची संख्या कमी असल्याने डॉक्टरांसह कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागते.दरम्यान, सीपीआर अंतर्गत गांधीनगर, कोडोली, गडहिंग्लज व लाईन बझार येथील सेवा रुग्णालय ही चार उपजिल्हा, तर १६ ग्रामीण रुग्णालये, इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालये अशी एकूण २१ रुग्णालये येतात. ग्रामीण रुग्णालये अपुºया सुविधामुळे बाळंतिणीला सीपीआरमध्ये आणतात.सीपीआरच्या प्रसूती विभागात १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ मध्ये एकूण २९९५ सिझेरियन, नॉर्मल ६०६२ व जुळी मुले ६८, मोठ्या शस्त्रक्रिया ३३६६, लहान शस्त्रक्रिया ५४४, तर १ एप्रिल २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सिझेरियन २०४८, नॉर्मल ४३४४, तर जुळी ५०, मोठ्या शस्त्रक्रिया २६१०, लहान शस्त्रक्रिया २१४ झाल्या आहेत. या विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष शानभाग आहेत.ग्रामीण रुग्णालयांवर हवा अंकुशग्रामीण रुग्णालये ही जिल्हा शल्यचिकित्सक अंतर्गत येतात; पण तेथील अपुरे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. ग्रामीण रुग्णालयांवर प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी यांचा अंकुश नसल्याच्या भावना रुग्ण, नातेवाइकांतून व्यक्त होत आहेत.जुळ्यांचे प्रमाणवाढतंय... एक तिळीगेल्या वर्षी मे २०१८ या महिन्यात तीन बाळंतिणीला दोन जुळी झाली आहेत, तर एका बाळंतिणीला तिळी (तीन अपत्ये) झाली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत एकूण ५० जुळी व एक तिळी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.