शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग एक करण्यासाठी आता भरावी लागणार जादा रक्कम, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जमिनींचे प्रस्ताव 'या' तालुक्यातील

By संदीप आडनाईक | Updated: March 13, 2024 17:31 IST

सवलतीच्या दराची मुदत ८ मार्चला संपली

संदीप आडनाईक

कोल्हापूर : भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ रूपांतर करण्यासाठी सवलतीच्या दराची मुदत ८ मार्चला संपल्यामुळे आता या कामासाठी संबंधित शेतकऱ्यांना जादा रक्कम भरावी लागणार आहे. वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वाधिक जमिनींचे प्रस्ताव करवीर आणि गगनबावडा येथील शेतकऱ्यांचे आहेत.कृषी वापरासाठी वितरित केलेल्या जमिनीसाठी सध्या बाजारमूल्याच्या ५० टक्के अधिमूल्य रक्कम भरण्याची सवलत आहे. मुदतवाढ न मिळाल्याने आता ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. वाणिज्य, औद्याेगिक वापरासाठी वाटलेल्या जमिनीसाठी ५० टक्के रक्कम भरण्याची सवलत आहे. मुदतवाढ न मिळाल्याने या जमिनींसाठी ६० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. रहिवाशासाठी कब्जेहक्काने वाटलेल्या जमिनींसाठी १५ टक्के भरण्याची सवलत होती, ती आता ६० टक्के इतकी वाढणार आहे. रहिवासासाठी भाडेपट्ट्याने वाटलेल्या जमिनीसाठी २५ टक्के सवलत होती, ती आता ७५ टक्के इतकी होणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने वाटलेल्या जमिनींसाठी १५ टक्के सवलत होती, तीही ७५ टक्के इतकी वाढलेली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जेहक्काने वाटलेल्या जमिनींसाठी १५ टक्के सवलत होती, तीही ६० टक्के इतकी होणार आहे.

पाच वर्षे मिळाली होती सवलत..

  • भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ रूपांतर करण्यासाठी सवलतीचा दर आकारण्याबाबत ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय झाला आणि तीन वर्षांची मुदत दिली होती. 
  • ही मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली, त्यानंतर त्याला लवकर मुदतवाढ मिळाली नाही. 
  • या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी ७५ टक्के दर आकारण्यात येऊ लागले. 
  • त्यालाही वर्ष होऊन गेले, तरी त्यावर निर्णय झाला नव्हता. यामुळे विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना, नागरिकांनी राज्य सरकारकडे पुन्हा मुदतवाढ मागितली. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य शासनाने ८ मार्च २०२२ पासून ८ मार्च २०२४ पर्यंत दोन वर्षांची मुदतवाढ दिली. ही मुदत आता आज संपत आहे. 
  • आता या सवलतीला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे; परंतु आता शेवटच्या दिवशी सादर होणारी प्रकरणे तीन महिन्यांत निकाली काढण्यास मात्र सवलत मिळाली आहे. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूर