शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कॅपिंग निविदेला मुदतवाढ, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 13:01 IST

कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्यावर कॅपिंग करण्याकरिता ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे यासंबंधीच्या निविदेला पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्देकचरा कॅपिंग निविदेला मुदतवाढअपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे निर्णय

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर साचलेल्या कचऱ्यावर कॅपिंग करण्याकरिता ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे यासंबंधीच्या निविदेला पुन्हा सात दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला आहे.शहरातील साचलेला कचऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता महापालिका प्रशासनाने कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवर कॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा खर्च सुमारे नऊ कोटी रुपये आहे. या कामासाठी पात्र ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या. आज त्याचा शेवटचा दिवस होता; परंतु ठेकेदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दोनच ठेकेदारांनी निविदा भरल्या आहेत. शासन मार्गदर्शनानुसार तीनपेक्षा कमी निविदा आल्यास मुदतवाढ देण्यात येते; त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.मुळात सध्याच्या कचऱ्यांच्या ढिगावर कॅपिंग करणे भविष्यकाळाचा विचार करता, व्यावहारिकदृष्ट्या सोईचे नाही. तरीही मागील आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तसा निर्णय घेतला. त्यास राज्य सरकारची परवानगीही मिळविली आहे. वास्तविक या ठिकाणी कॅपिंग केले तर येथील जागेचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे; त्यामुळे भविष्यात कचरा डंपिंग करणार कोठे? हा प्रश्न आहे.या आधी हा सर्व कचरा टाकाळा येथील खाणीत टाकण्यात यायचा होता; त्यासाठी अडीच ते तीन कोटी रुपये खर्च करून तेथे कचरा टाकण्याकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीने खण विकसित केली होती; परंतु कसबा बावडा येथील डंपिंग ग्राऊंडवरील विघटन न होणारा कचरा टाकाळा येथे आणून टाकण्याकरिता येणारा वाहतूक खर्च अंदाजे १४ ते १५ कोटी येणार असल्याने त्यापेक्षा तुलनेने कमी खर्चाचा कॅपिंग करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर