शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीवरील हरकतीसाठी मुदतवाढ : पाच डिसेंबरपर्यंत दावे, हरकती स्वीकारल्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:26 IST

लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमतदार यादीवरील हरकतीसाठी मुदतवाढ पाच डिसेंबरपर्यंत दावे, हरकती स्वीकारल्या जाणार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागातर्फे करण्यात आले आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम घेतला. यामध्ये जिल्ह्यात १ लाख २४ हजार ४३७ मतदार वाढले, तर ४ हजार २४३ मतदार हे विविध कारणांमुळे रद्द होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात प्राप्त अर्जांची शहानिशा व दावे हरकती घेण्यासाठी महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. त्याचा अखेरचा दिवस शुक्रवारी होता; परंतु निवडणूक आयोगाकडून यासाठी आणखी पाच दिवस मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक आयोगाला कळविण्यात आले. त्यानुसार आणखी पाच दिवस म्हणजे पाच डिसेंबरपर्यंत मतदार यादीसंदर्भातील अर्जांच्या हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नियुक्ती केलेल्या १५ झोनल अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये कामाचे स्वरूप व जबाबदारी याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर