शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात सुविधांची एक्स्प्रेस रखडली

By admin | Updated: May 15, 2015 23:39 IST

आदर्श रेल्वेस्थानक कागदावरच : प्रशासकीय काम रेंगाळले, ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ म्हणीप्रमाणे कारभार

संदीप बावचे - जयसिंगपूर -आदर्श रेल्वेस्थानक म्हणून जयसिंगपूर रेल्वेस्थानक कागदावरच राहिले आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार ही अपेक्षाच राहिल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय काम रेंगाळल्यामुळे येथील रेल्वेस्थानकाचा कायापालट होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. लोकप्रतिनिधींकडून सोयीसुविधा बाबत पाठपुरावा केला जातो. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे जयसिंगपूर रेल्वेस्थानकात सुविधा मिळण्यास अडचणी ठरत असल्याने सुविधांची एक्स्प्रेस केव्हा धावणार? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.नोकरी, कामानिमित्ताने शेकडो प्रवासी दररोज जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे नाते रेल्वेस्थानकाशी अगदी घट्ट झाले आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे प्रवास सोयीस्कर ठरत आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत थोडाफार या ठिकाणी विकासात्मक बदल झाल्यामुळे प्लॅटफार्म, ओव्हरब्रीज, तिकीट व्यवस्था, अशी सुविधा सुरू झाली. मात्र, शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील प्रवाशांची नाळ जोडणाऱ्या या स्थानकात भरीव सुविधा नसल्यामुळे केवळ थांब्याचेच ठिकाण म्हणून या स्थानकाकडे पाहिले जात असताना रेल्वे मंत्रालयाने आदर्श स्थानक योजनेमध्ये जयसिंगपूर रेल्वेस्थानकाचा समावेश केला. डिसेंबर २०१४ मध्ये ही घोषणा करण्यात आली. या योजनेत येथील रेल्वेस्थानकाचा समावेश झाल्यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार ही अपेक्षा होती. शिवाय या स्थानकावर बहुतेक सुविधा नसल्यामुळे आजपर्यंत विकासात्मक दृष्टिकोन दिसून आला नव्हता. खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरील सोयी-सुविधेसाठी विशेष प्रयत्न करून आदर्श स्थानक योजनेमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला होता. एकीकडे लोकप्रतिनिधींनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पाठपुरावा करायचा, तर दुसरीकडे प्रशासनातील ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे कारभार करायचा, अशी वस्तुस्थिती बनली आहे. यामुळे जयसिंगपुरातील सुविधांची एक्स्प्रेस केव्हा धावणार, असाच प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.आदर्श रेल्वेस्थानक योजनेंतर्गत स्थानकाचे सौंदर्यकरण, वॉटर कुलर, अत्याधुनिक सिग्नल व्यवस्था, प्रतीक्षालय, अंघोळीच्या सुविधेसह विश्रांतीगृह, आवश्यक प्रकाशयोजना, संगणकावर आधारित ग्राहक सूचना, पादचाऱ्यांसाठी ओव्हर ब्रिज, एटीएम सुविधा, स्वच्छतागृह, प्लॅटफार्म दुरुस्ती, बुक स्टॉल अशा सुविधांचा समावेश आहे.ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकस्वातंत्र्यपूर्व काळापासून जयसिंगपूर येथे रेल्वेस्थानकाची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे या स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिरोळला कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील भाजीपाला मुंबईसह अन्य मोठ्या बाजारपेठेत पाठविला जातो.