शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘तान्हाजी’ चित्रपटाच्या तिकिटावर धमाकेदार आॅफर्स--तुडुंब प्रतिसाद : खाण्या-पिण्याबरोबर राहण्यात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:07 IST

या आॅफर्सना तुडुंब प्रतिसाद मिळत असून, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनीही याचे कौतुक केले आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, मिसळ, वडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. याशिवाय मोबाईल अ‍ॅक्सेसरीज मोफत देण्याचीही काही व्यावसायिकांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्दे‘तान्हाजी’सारखा एखादा चित्रपट निर्माण होत असेल तर आपण सर्वांनीच प्रतिसाद दिला पाहिजे. ‘तान्हाजी’सारखा एखादा चित्रपट निर्माण होत असेल तर आपण सर्वांनीच प्रतिसाद दिला पाहिजे.

शेखर धोंगडे ।कोल्हापूर : अजय देवगणचा बहुचर्चित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर चांगलाच हिट होत आहे. हा ऐतिहासिक सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे विविध आॅफर्स दिल्या आहेत. यामध्ये मोबाईल अ‍ॅक्सेसरीज, खाण्यापिण्यामध्ये सवलतीसोबत एकवेळ मोफत राहण्याचाही समावेश आहे. या आॅफर्सना तुडुंब प्रतिसाद मिळत असून, तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनीही याचे कौतुक केले आहे.

शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट अधिकाधिक रसिकांनी पाहावा म्हणून अनेकांनी धडाकेबाज आॅफर्स दिल्या असून, त्याचा प्रसार व्हॉट्स अ‍ॅपवर सुरू आहे. जोपर्यंत हा सिनेमा चित्रपटगृहात आहे, तोपर्यंत या आॅफर्स सुरू राहणार आहेत.

कोल्हापुरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी तान्हाजी सिनेमा पाहिल्याचे तिकीट दाखवा आणि जेवणावर १0 ते २0 टक्के सवलत दिली आहे. यामध्ये हॉटेल व्यावसायिक, मिसळ, वडा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश आहे. याशिवाय मोबाईल अ‍ॅक्सेसरीज मोफत देण्याचीही काही व्यावसायिकांनी जाहीर केले आहे. 

  • मालुसरे यांच्या वंशजांकडून कौतुक

पन्हाळ्याजवळील वाघबीळ येथील एका हॉटेल व्यावसायिकाने तर मे महिन्यापर्यंत चित्रपटाचे तिकीट जपून ठेवा आणि जोतिबा तसेच पन्हाळा येथे येणाºया पर्यटकांची राहण्याची मोफत व्यवस्था केली जाईल, अशी आकर्षक आॅफर दिली आहे. त्यांच्या या आॅफरचे कौतुक तान्हाजी मालुसरे यांचे १२ वे वंशज सुनीता नितीन मालुसरे यांनी केले. 

‘तान्हाजी’सारख्या मावळ्यावरील सत्यकथा देशाबरोबर परदेशातील लोकांनीही पाहावी, आपल्या खºया शूरवीरांची ओळख जगाला झाली पाहिजे.- अमोल गुरव, कोल्हापूर 

हा सिनेमा करमुक्त करावा. मुलांना आणि तरुणाईला ऐतिहासिक ठिकाणे दाखवावेत; येणाऱ्यांसाठी माझ्याकडे मोफत राहण्याचे आमंत्रण देत आहे.- विनोद पाटील, कोल्हापूर

 

...तर अन्य मावळ्यांचाही इतिहास समजेलइतिहासात तानाजीसारखे शिवाजी महाराजांचे असंख्य मावळे आहेत. ‘तान्हाजी’सारखा चित्रपट चांगला गाजला तर भविष्यातही असाच आमच्या राजांचा आणि शिलेदारांचा इतिहास जगाला दाखविण्यासाठी आणखी काही दिग्दर्शकांचा उत्साह वाढेल. मराठी बांधवांसह देशातील सर्व चित्रपटरसिकांना हा चित्रपट पाहता यावा. परंतु ‘तान्हाजी’सारखा एखादा चित्रपट निर्माण होत असेल तर आपण सर्वांनीच प्रतिसाद दिला पाहिजे. तो पाहिला पाहिजे म्हणूनच आम्ही आॅफर ठेवल्या आहेत.- गणेश माने,  कोल्हापूर.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAjay Devgnअजय देवगणcinemaसिनेमाbusinessव्यवसाय