शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाणी भेसळयुक्त पेट्रोल विक्रीचा प्रकार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 16:28 IST

कोल्हापूर शहरात वितरित होणाऱ्या पेट्रोल पंपामधून वितरित होणो पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचा प्रकार कोल्हापूर जनशक्ती संघटनेने उघडकीस आणला. यासंदर्भात शिष्टमंडळाने सोमवारी (दि.६) जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. पाणीमिश्रीत पेट्रोलची बाटली पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवून संबंधित पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्दे ‘कोल्हापूर जनशक्ती’तर्फे पंपचालकांवर कारवाईची मागणी जिल्हा पुरवठ अधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : शहरात वितरित होणाऱ्या पेट्रोल पंपामधून वितरित होणो पेट्रोलमध्ये पाण्याची भेसळ होत असल्याचा प्रकार कोल्हापूर जनशक्ती संघटनेने उघडकीस आणला. यासंदर्भात शिष्टमंडळाने सोमवारी (दि.६) जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. पाणीमिश्रीत पेट्रोलची बाटली पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवून संबंधित पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.निवेदनात म्हंटले आहे की, काही पंपचालकांच्या पेट्रोल साठवणुकीच्या टाक्यांमध्ये पूर्वीपासूनच पाणी असण्याची दाट शक्यता आहे. त्यातच ग्राहकाला मिळणारे पेट्रोल शुध्द आहे का हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्याचा गैरफायदा घेऊन काही पंपचालक ग्राहकांना लुबाडत आहेत. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात इंडियन आॅइल कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीचे २५१ इतके पंप आहेत. अन्य काही खासगी कंपन्यांचे पेट्रोल पंपही आहेत. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे. मात्र, या पेट्रोलमधय्े किती टक्के इथेनॉल मिसळले जाते याबाबत सर्वच अनभिज्ञ आहेत.

काही पेट्रोल पंपांवर इंधन टाकीत पेट्रोल साठविण्यापूर्वीच पाणी असते. त्यामुळे पेट्रोल भरताना पाणीमिश्रित पेट्रोल ग्राहकांना मिळत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी.

यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकारी व वितरकांची बैठक घेऊन खुलासा करण्याची सुचना देऊ, असे सांगितले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष समीर नदाफ, राजन पाटील, इकबाल मुल्ला, तुकाराम भालेकर, बाबा वाघापूरकर, गुफरान मणेर, अमोल हंजे आदींचा समावेश होता.

कोल्हापूर शहरात पाणी भेसळयुक्त पेट्रोलची विक्री सुरु असून संबंधित पंपचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली. 

 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपkolhapurकोल्हापूर