कोल्हापूर जिल्ह्यामधील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच बदलेले आहेत. शासनाकडून मिळणारे मानधन मात्र त्यांना मिळत नाही. संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणी येत आहेत. संगणकावर योग्य माहिती भरूनही सर्व्हर डाऊनचे कारण पुढे करून नूतन पदाधिकारी यांना मानधन दिले जात नाही हा अन्याय असल्याने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोट -
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना त्वरित मानधन द्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील नूतन ग्रामपंचायती पदाधिकाऱ्यांचे मानधन संगणक तांत्रिक त्रुटीतून रखडले आहे. कोरोनाच्या काळात प्रामाणिकपणे काम करूनही सरपंच, उपसरपंच यांना मानधन व भत्ता न मिळाल्यास आंदोलन छेडणार.
- दिनकर सूर्यवंशी,
( महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हा सहचिटणीस)