शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

माजी सैनिकाकडून कोटीचा गंडा

By admin | Updated: July 3, 2014 01:13 IST

सैन्य भरतीचे आमिष : कोल्हापुरात अटक; युवकांची फसवणूक

कोल्हापूर : गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना सैन्यभरतीचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा घालणाऱ्या माजी सैनिकाच्या मुसक्या आज, बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. संशयित भामटा संदीप बळवंत गुरव (वय ३०, रा. आपटेनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, संदीप गुरव हा मूळचा भाटिवडे (ता. भुदरगड); परंतु तो सध्या आपटेनगरमध्ये प्लॉट नंबर १३, संस्कार बंगला, शांती उद्यानशेजारी राहत होता. त्याने सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण सैन्यात अधिकारी असल्याच्या भूलथापा मारून दुष्काळग्रस्त कवठेमहांकाळ तालुक्यातील ४० ते ५० सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सैन्यभरतीचे आमिष दाखवून सुमारे एक कोटीचा गंडा घालून पसार झाला होता. फसवणूक झालेल्या तरुणांनी पुणे आयुक्तालयातील खडकी पोलीस ठाण्यात गुरव यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन घटनेबाबतचा सर्व वृत्तांत कथन केला. पुणे आयुक्तालयातील खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अनिल पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्ह्यातील संशयित भामटा हा कोल्हापूर येथील रहिवासी असल्याने त्यांनी तपासासाठी सहकार्य करण्यासाठी काल, मंगळवारी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. (पान १ वरून) देशमुख यांनी तातडीने शोधमोहीम राबविली. आपल्या टीममधील दोन पथके गुरव राहत असलेल्या आपटेनगर व भाटिवडे येथे पाठविली. परंतु आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो तेथून पसार झाला होता. आपले अस्तित्व लपविण्याच्या उद्देशाने तो पोलिसांना चकवा देत लपून बसला होता. त्यानंतर देशमुख यांनी त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळविले तसेच खबऱ्यांद्वारे माहिती घेतली असता त्याचे वास्तव्य आमरोळी (ता. चंदगड) येथे असल्याचे समजले. त्यानुसार त्या परिसरात पाळत ठेवून त्याला अटक केली. आरोपीस पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर हजर करून त्याला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी) गृहमंत्र्यांकडून दखलफसवणूक झालेल्या युवकांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन संदीप गुरव याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची गृहमंत्री पाटील यांनी तत्काळ दखल घेत पुणे आयुक्तालयास चौकशी करून आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली. बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्यास अटक केल्याची माहिती मिळताच गृहमंत्री पाटील यांनी कोल्हापूर पोलिसांचे फोनवरून अभिनंदन केले. व्याप्ती मोठीभामटा गवळी हा १२ वर्षांपूर्वी सैन्यदलात लान्स नायक पदावर भरती झाला. त्याने भोपाळ, इंदोर, जम्मू-काश्मीर, सिकंदराबाद आदी ठिकाणच्या सैन्यदलात काम केले. त्यानंतर नोकरी सोडून दिली. आपटेनगर येथे बंगला बांधला. काही वर्षांपूर्वी कौटुंबीक वादातून त्याची पत्नी चार वर्षाच्या मुलासह त्याला सोडून गेली. त्यामुळे सध्या तो एकटाच राहत असे. सैन्यातील कामाचा अनुभव, वक्तृत्व कौशल्य आणि सैन्यदलातील पोशाखाचे फोटो दाखवून तो तरुणांना भुरळ पाडत असे. त्याने सांगली, पुण्यासह कोल्हापूर जिल्ह्णांतील तरुणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.