शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माणगावमध्ये खुल्या आरक्षणामुळे उत्साह

By admin | Updated: December 28, 2016 00:05 IST

इच्छुकांची मोठी रांग : राजकीय युत्या कशा होतात यावरच समीकरणे अवलंबून; पुनर्रचनेमुळे उमेदवारांची दमछाक होणार

नंदकुमार ढेरे --चंदगड --मतदारसंघ पुनर्रचनेत पूर्वीचा हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव आता माणगाव जि. प. असे झाले आहे. पूर्वीचे हलकर्णी व कुदनूर जि.प. मतदारसंघातील काही गावे समाविष्ठ करून माणगाव हा नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघ सर्वसाधारण पुरुष उमेदवारासाठी खुला झाल्याने या ठिकाणी डझनावर उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. हा मतदारसंघ माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील व माजी आमदार (कै.) नरसिंगराव पाटील यांचा बालेकिल्ला आहे. परंतु, या निवडणुकीत राजकीय युत्या कशा होतात यावरच बरेच काही अवलंबून आहे. या मतदारसंघावर (पूर्वीच्या हलकर्णी जि. प.) भरमू पाटील यांचेच वर्चस्व राहिले आहे.२००० ते २०१२ पर्यंत माजी सभापती भरमाण्णा गावडा, तर २०१२ सालच्या निवडणुकीत भरमू पाटील यांच्या स्नुषा जि. प.च्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती दीपक पाटील निवडून आल्या आहेत. याच जि.प. मतदारसंघांतर्गत पंचायत समितीच्या माणगाव गणातून अनिल सुरुतकर व हलकर्णी गणातून उपसभापती शांताराम पाटील निवडून आले आहेत.माणगाव मतदारसंघ यावेळी खुला झाल्याने राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या डझनावर असेल. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ज्योती दीपक पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांत गाववार विकासकामे केली आहेत.तरुण मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे यासह शेतकरी वर्गासाठी राबविलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे त्यांनी मतदारसंघावर मजबूत पकड निर्माण केली आहे. त्याचा लाभ यावेळी या मतदारसंघात उभे राहणाऱ्या राष्ट्रीय काँगे्रसच्या उमेदवाराला होणार आहे.गतनिवडणुकीत तुर्केवाडी जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून गेलेले सदस्य महेश पाटील यावेळी माणगाव मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याची शक्यता आहे. त्यांचे बंधू गोकुळ दूध संघाचे संचालक राजेश पाटील हेदखील याच मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र, हे त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून असेल. याशिवाय पंचायत समिती सदस्य अनिल सुरूतकर, माणगावचे तंटामुक्त अध्यक्ष शामराव बेनके, कोवाडचे माजी सरपंच उद्योजक कल्लाप्पा भोगण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय उर्फ भुजंगराव पाटील, तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर, ग्राहक सेनेचे तालुकाध्यक्ष राजू रेडेकर, भाजपमधून सुरेश घोटगे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बाळाराम फडके, प्रा. दीपक पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, गौरव नाईक यांच्यासह काही अपक्षही निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत भौगोलिक विस्तार पाहता नागनवाडी ते राजगोळी-यर्तेनहट्टी असे ५० कि. मी. अंतराचा हा मतदारसंघ तयार झाला आहे. त्यामुळे विस्ताराने मोठा असलेल्या या मतदारसंघात कमी कालावधीत प्रत्येक कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवताना आणि मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.माणगावमाणगाव जि.प. मतदारसंघाची एकूण संख्या ३८,०५२ इतकी असून, या मतदारसंघांतर्गत माणगाव पंचायत समिती मतदारसंघ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला तर कुदनूर पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.कुदनूर पंचायत समितीघुल्लेवाडी ७०४, जक्कनहट्टी २८४, निट्टूर २२४९, तेऊरवाडी १५३६, कोवाड २६९८, दुंडगे ९४९, चिंचणे ४७३, कामेवाडी ७६९, राजगोळी खुर्द २२९८, चेन्नेट्टी-यर्तनहट्टी ५९५, राजगोळी बुद्रक ८६८, दिंडलकोप ६२१, तळगुळी १०७९, कुदनूर ३०७३. अप्पी पाटलांचे उमेदवार रिंगणातगत विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी उर्फ विनायक पाटील, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सोयीनुसार आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.