कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय) स्टुडंट शाखेच्यावतीने आयोजित ऑनलाईन प्रादेशिक विद्यार्थी संमेलन (महाराष्ट्र आणि गोवा विभाग) उत्साहात पार पडले. ‘कोविडदरम्यान अभियांत्रिकी शिक्षणातील विकसनशील ट्रेंड’ अशी या अधिवेशनाची संकल्पना होती.
या अधिवेशनाचे उद्घाटन केआयटीचे उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी, सीएसआयचे अध्यक्ष प्रा. ए. के. नायक, क्षेत्रीय उपाध्यक्ष प्रदीप राठी यांनी केले. यावेळी केआयटीच्या सीएसई विभागाच्या प्रमुख डॉ. ममता कलस, सीएसआय विद्यार्थी शाखेचे विद्यार्थी शाखा समुपदेशक ए. एस. पाटील, आयोजन प्रमुख रंजिता पांढरे, एस. एस. राबाडे, विद्यार्थी समन्वयक तनिष्का चौगुले, अधिष्ठाता मनोज मुजुमदार उपस्थित होते.
अधिवेशनात सहा वेगवेगळे तांत्रिक व नॉन-तांत्रिक स्पर्धा घेण्यात आल्या. यात पेपर प्रेझेंटेशन, गटचर्चा झाली. त्यात अविनाश पांडे, रूपेश देवन यांनी विचार मांडले. कोडिंग, वेबसाईट डिझायनिंग, लघु फिल्म बनविण्याची स्पर्धा झाली. विजेत्यांना बंगलोरच्या रॉयल डच शेलचे संचालक निलोथपाल साहा यांच्याहस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. आयटीमधील सद्य ट्रेंड आणि क्लाऊड आणि डेटा अॅनालिटिक्समधील संधी याबाबतची माहिती दिली. यावेळी केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, सचिव दीपक चौगुले यांनी मार्गदर्शन केले.