शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत नवीन रस्ते खुदाई सुरूच

By admin | Updated: May 17, 2017 23:16 IST

नागरिकांतून तीव्र संताप : संबंधितांवर कारवाई होत नसल्याने प्रकार वाढले; प्रशासन गप्पच

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरामध्ये नव्याने केलेले रस्ते खुदाईचे काम बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शहरातील मुख्य असणाऱ्या छत्रपती शिवाजी पुतळा चौकात गळती काढण्याच्या नावाखाली खुदाई करण्यात येत आहे. याबाबत वृत्तपत्रांतून आवाज उठवूनही नगरपालिका प्रशासन, पालिकेतील कारभारी अथवा लोकप्रतिनिधी कोणीच काही बोलायला तयार नाहीत. सर्वजण मूग गिळून गप्प बसल्याने यामागे काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरामध्ये नवीन रस्ते केल्यानंतर पंधरा दिवसांतच शाहू पुतळ्याजवळ रस्ता खुदाई केली होती. या ठिकाणी पाच दिवस पाईपलाईनचे काम सुरू होते. त्यावेळीही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. रविवारी (दि. १४) बीएसएनएल कार्यालयासमोरचा नवीन रस्ता शौचालय ड्रेनेजला जोडण्यासाठी म्हणून खुदाई केला. मंगळवारी (दि. १६) गुरुकन्नननगर व हिरकणी हॉटेलजवळ पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह सापडत नसल्याने खुदाई केली. खारुडेकर वखार, दातार मळा येथे नवीन नळ जोडणीसाठी खुदाई, संत मळा येथे व्हॉल्व्ह रस्त्यापासून वर घेण्यासाठी खुदाई केली. खुदाईवेळी काही ठिकाणी कामगारांनी उद्धट उत्तरे देत ‘आमच्या मालकाने (मक्तेदार) नियोजन लावले आहे. फोटो काढून छापला तरी काही फरक पडत नाही’, असा वाद घातला. तो खरा ठरल्याप्रमाणे बुधवारी पुन्हा छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ खुदाई सुरू झाली आहे. हा प्रकार नेमका किती दिवस चालणार? शहरातील अन्य काही ठिकाणीही गळती लागल्याचे समजते. तेथेही पालिका खुदाई सुरू करणार का? मग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते करण्यापूर्वी जाहीर केलेल्या आवाहनाचे काय? ड्रेनेज व पाईपलाईनची कामे रस्ता करण्यापूर्वीच करून घेण्याची सूचना असतानाही नवीन रस्ता खुदाई का? मोर्चे, आंदोलने झाल्यानंतरच पालिका, प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.सोशल मीडियावरून रस्ता खुदाईवर टीकाशहरातील रस्ता खुदाईचे छायाचित्र काढून ते सोशल मीडियावरून सर्वत्र पसरवून त्यावर टीका करण्यात येत आहेत. त्यामध्ये नगरपालिकेच्या तिन्ही बाजूने खुदाई करण्यासाठी निवेदन द्यावे. कारण नगरपालिकेच्या लोकांना खुदाई झालेला रस्ता बघितल्याशिवाय जमत नाही. चांगला रस्ता बघवत नाही. नवीन रस्ता केल्यानंतर नळ जोडणी घेणाऱ्या नागरिकांचा सत्कार करा. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ अशी भूमिका, अशा अनेक टीका सोशल मीडियावर फिरत आहेत.नवीन रस्ता खचला : चांदणी चौक ते मरगुबाई मंदिर हा रस्ता ड्रेनेज असलेल्या दोन ठिकाणी खचला आहे. कच्च्या ड्रेनेजवरच घाईगडबडीने रस्ता केल्यामुळे तो खचला असण्याची शक्यता असून, अपघाताला निमंत्रण मिळत आहे.