शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मनकर्णिका कुंडाचे १५ दिवसांनंतर उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 16:56 IST

अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे. उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे.

ठळक मुद्देमनकर्णिका कुंडाचे १५ दिवसांनंतर उत्खननदेवस्थानकडून थांबलेल्या कामांची सुरुवात

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननास १५ दिवसांनंतर सुुरुवात होणार आहे. सध्या येथील झाडे काढून तेथील बांधकाम हटविण्यात येत आहे.उत्खननाची निविदा प्रक्रिया पार पाडून प्रत्यक्ष काम सुरू करण्यास जून महिना उजाडणार आहे.दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची लॉकडाऊनमुळे थांबलेली मंदिरे व जमिनींचा सर्व्हे, स्ट्रक्चरल ऑडिट, जोतिबा मंदिर दर्शन मंडप ही कामे पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.देवी अंबाबाईच्या स्नानाचे पाणी जिथे जाते त्या मनकर्णिका कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देवस्थान समितीने पुरातत्त्व खात्याकडे परवानगी मागितली होती.

ती मिळाल्यानंतर समितीने येथील झाडे तोडण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली. त्यानंतर पुढील काही दिवसांत लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे येथील उत्खननासह देवस्थान समितीची सुरू असलेली सगळी विकासकामे थांबवण्यात आली. मात्र दोन आठवड्यांपूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्याने समितीने पुन्हा कामांना सुरुवात केली आहे.

त्याअंतर्गत परिसरातील झाडे तोडण्यात आली आहेत. येथे पूर्वी झालेले स्वच्छतागृहांचे बांधकाम, कट्टे, भराव हे सगळे काढून हा परिसर जमिनीलगत करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.उत्खननासाठी शासकीय नियमानुसार निविदा प्रक्रिया करावी लागते; त्यामुळे टेंडर नोटीस काढणे, त्यासाठी अर्ज येऊन एकाची निवड करणे व प्रत्यक्ष वर्क ऑर्डर काढणे या सगळ्या प्रक्रियेला किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कामगारांकडून हे काम करून घेतले जाईल. पुढे पावसाळा असल्याने त्याआधी अधिकाधिक भराव काढून टाकण्याचा समितीचा मानस आहे.समितीने सुरू केलेली कामे

  • जोतिबा येथील दर्शन मंडपाचे बांधकाम
  • अखत्यारीतील मंदिरे व जमिनींचे सर्वेक्षण
  •  मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल
  • ताराबाई रोड येथील साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागेवर सातमजली भक्त निवास बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया.

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर