शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुराव्यांवरून ‘अंबाबाई’ असल्याचेच सिद्ध

By admin | Updated: November 30, 2015 01:10 IST

रमेश कुलकर्णी यांचे आव्हान : कोणाला चर्चा करायची असल्यास इतिहास परिषदेचीही तयारी

कोल्हापूर : अंबाबाई संदर्भातील मूर्ती शास्त्र, वेद साहित्य आणि वेदांपूर्वीचे पुरावे हे ती आदिमाया अंबाबाईच असल्याचे अधोरेखित करतात. यावर जर कुणा तज्ज्ञांना वा पंडितांना चर्चा करायची असल्यास दोन दिवस शाहू स्मारक भवनमध्ये इतिहास परिषद घेण्याची तयारी आहे, असे आव्हान अ‍ॅड. रमेश कुलकर्णी यांनी रविवारी येथे दिले.करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त मंडळातर्फे शाहू स्मारक भवन येथे ‘आदिमाया अंबाबाई, पार्वती की लक्ष्मी?’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत होते. यावेळी मंडळाचे कार्यवाह दिलीप पाटील, सहकार्यवाह वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, निवासराव साळोखे, डॉ. शिवाजीराव हिलगे, शैलजा भोसले, आदी प्रमुख उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, याबाबत जर कोणी मौन बाळगत असेल तर आपल्या मताशी सहमतीच असेल असे गृहीत धरू, असेही अ‍ॅड. कुलकर्णी म्हणाले. अंबाबाईचा महालक्ष्मी किंवा लक्ष्मीशी काहीही संबंध नाही. तसेच महालक्ष्मीचा तिरुपतीशीही काहीही संबंध नाही. मूर्ती शास्त्र, वेद साहित्य आणि वेदांपूर्वीच्या काळातील पुरावे हे आदिमाया अंबाबाई असल्याचेच सिद्ध करतात. बौद्ध धर्माचा प्रसार वाढल्यावर आंध्र प्रदेशमध्ये वैष्णव पंथाच्या लोकांनी इ.स. ८२६ मध्ये तिरुपती मंदिराची स्थापना केली; तर त्यापूर्वी चालुक्य राजाने इ.स. ५५० मध्ये अंबाबाईचे मंदिर कोल्हापुरात बांधले. यावरून तिरुपती मंदिर हे अंबाबाई मंदिरानंतर झाल्याचे स्पष्ट होेते. मग अंबाबाई तिरुपतीची पत्नी कशी काय होऊ शकते, हा प्रश्न आहे. जर कोणाला हे योग्य वाटत नसेल तर त्यांनी याचे पुरावे द्यावेत. अंबाबाईच्या मूर्तीवरील नागासह असंख्य पुरावे या मूर्तीसह मंदिरात मिळतात. त्यानुसार हे मंदिर शैव असल्याचे स्पष्ट होते. इतर पुराव्यांमध्ये लक्ष्मीचे स्वतंत्र असे मंदिर भारतात कोठेही नाही. ती नेहमी विष्णूबरोबर असल्याने त्या दोघांचीच मंदिरे आढळतात. एकट्या देवीचे मंदिर हे फक्त पार्वतीच्या रूपातील देवीचेच असते. (उदा. काली, दुर्गा, महामाया, महालक्ष्मी) अशी मंदिरे देशभर आहेत. या पुराव्यांवरून अंबाबाईच असल्याचे सिद्ध होते. आमची सर्व देवींवर श्रद्धा आहे. परंतु, ज्या देवीचे जिथे स्थान आहे, तिथेच ते रहावे, आपल्याला हवे म्हणून नको तो खेळ करू नये. (प्रतिनिधी)प्रशासन, पुजाऱ्यांना आवाहन : पुरावे ग्राह्य धरादेवीचे स्वरूप हे पार्वतीचे असताना अंबाबाईची कमळामध्ये बसलेल्या लक्ष्मीची पूजा बांधण्याचा पुजाऱ्यांचा हेतू स्वच्छ दिसत नाही. यामागे मोठे अर्थकारण दडले आहे. येथील ७५ टक्के उत्पन्न हे नाहक पुजाऱ्यांच्या खिशात जाते. त्याचा उपयोग मंदिर संवर्धनासाठी अथवा अन्य कामांसाठी होत नाही. सर्व पुरावे अंबाबाई असल्याचे स्पष्ट असताना जिल्हा प्रशासन व पुजारी हे का मानत नाहीत? असा सवाल इंद्रजित सावंत यांनी केला.अंबाबाई भक्तांच्या मागण्याजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मूर्तीवर नाग घडविण्यासाठी शासनाने तातडीने सर्व समावेशक समिती स्थापन करावी.कोल्हापुरातील सर्व संस्था व शासकीय कार्यालयांनी मंदिराचा उल्लेख अंबाबाई असा करावा.भक्तांनी देवीला अर्पण केलेली दक्षिणा योग्य ठिकाणी जमा होण्यासाठी दर्शन रांगेत फलक व ध्वनिक्षेपकामार्फत आवाहन करण्यात यावे.