शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी हजारो सेट-नेटधारक बेरोजगारीच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:51 IST

कोल्हापूर : एकीकडे एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, राष्ट्रीय

ठळक मुद्दे भरती बंदीचा परिणाम : सरकारविरोधात वाढता रोष; अनेकांचे करिअर पणाला

संतोष मिठारी ।कोल्हापूर : एकीकडे एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) व राज्य पात्रता परीक्षा (सेट) यामध्ये उत्तीर्णतेची वाढलेली टक्केवारी आणि दुसरीकडे सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी गेल्या सहा वर्षांपासून असलेली बंदी यामुळे शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. तरीही शासनाला याबाबत गांभीर्य आलेले नाही.

सध्या विद्यापीठामध्ये पीएच. डी.च्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षे लागतात. त्यामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यासह नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सहायक प्राध्यापकपदाच्या नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाºया उमेदवारांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. सहायक प्राध्यापक होण्याची पूर्ण पात्रता असूनही नोकरी मिळत नाही.काही सी.एच.बी.धारक हे वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. किमान दहा वर्षे तरी कायमस्वरूपी नोकरी करून काहीसे सुखाने जगता येईल, या आशेने ‘सीएचबी’वर कार्यरत आहेत. सहायक प्राध्यापकांची ९ हजार ५११ पदे रिक्त असूनही भरती करीत नसल्याने राज्य सरकारविरोधात बेरोजगारांचा रोष वाढत आहे.समन्वय महत्त्वाचाशासनाकडून पदभरतीला मान्यता दिली जात नाही. आतापर्यंत किती विद्यार्थी नेट-सेट उत्तीर्ण झाले आहेत, याची कोणतीही माहिती यूजीसी, राज्य शासनाकडे उपलब्ध नाही.एखाद्या विषयाचा दर्जा वाढवायचा असेल, तर यूजीसी आणि शासनामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.आत्महत्येचा प्रयत्न ?मुखेड (ता. नांदेड) येथील एका विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाºया प्रा. बाबूराव पवळे यांना गेल्या चार वर्षांपासून वेतन मिळाले नसल्याने आॅगस्ट २०१७ मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.