शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निवडूंगापासून बटवा, प्रदूषणाला हटवा; वेलिंग्टन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

By पोपट केशव पवार | Updated: December 13, 2023 17:04 IST

३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी कृषीतंत्रज्ञान, इलेक्ट्रिक, पर्यावरणसह विविध विषयांवर प्रकल्प सादर केले.

पोपट पवार, कोल्हापूर : जंगलात, रानावनात दिसणारे निवडूंग ही सर्वांच्याच ओळखीची वनस्पती. त्यामुळे तसे तिचे अप्रूप अनेकांना नाही. मात्र, याच निवडूंगापासून पर्यावरणाचे रक्षण करत सांगलीच्या वेलिंग्टन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घड्याळाचा बेल्ट, औषधी गोळ्यांवरील आवरण, बटवा बनवून केमिकल वापरला कायमचा फाटा दिला आहे. निवडुंगापासून बायोप्लास्टिक ही संकल्पना त्यांनी विकसित केली आहे. शिवाजी विद्यापीठात बुधवारी आयोजित अविष्कार संशोधन महोत्सवात सादर केलेल्या अनोख्या संशोधनाने निवडूंगाचे महत्व अधोरेखित केले. कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी कृषीतंत्रज्ञान, इलेक्ट्रिक, पर्यावरणसह विविध विषयांवर प्रकल्प सादर केले.

 वेलिंग्टन महाविद्यालयातील बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे सुरजित आडगले व आस्था कुंदले या विद्यार्थ्यांनी निवडुंगावरचे हे संशोधन केले. गेल्या अडीच वर्षांपासून या विद्यार्थ्यांनी या संशोधनासाठी प्रयत्न चालविले होते. त्यासाठी त्यांनी निवडुंगाचे विविध गुणधर्म, त्याचे परिणाम याचा अभ्यास करून त्यापासून विविध प्रोडक्ट बनविले आहेत.

चौकट : जळाले तर होणार लिक्विड :

घड्याचा बेल्ट हा चामड्यापासून तयार केलेला असतो. तो मजबूत बनवण्यासाठी त्यात केमिकलचा वापर होतो. याला आळा घालण्यासाठी या विद्यार्थ्यांनी निवडूंगापासून बेल्ट तयार केला आहे. यामुळे हातालाही उबदारपणा जाणवतो. फुड पॅकेजिंग बॉक्सही निवडुंगापासून तयार केले आहेत. विशेष म्हणजे या वस्तु जळाल्या तर त्याचे अपोआप लिक्विडमध्ये रुपांतर होते. हेच लिक्विड इतर घटकांसाठीही वापरता येते. भविष्यात निवडुंगापासून कोट बनिवण्याचा मानस असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली