शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 17:04 IST

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा वेतन वाढीचा करार तातडीने करावा, या व इतर मागण्यांसाठी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी ...

ठळक मुद्दे बँक कर्मचारी संप : लक्ष्मीपुरीमध्ये सरकार विरोधात जोरदार निदर्शनेसरकारी बँकेतील विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी दोन दिवस ‘काम बंद’ची हाक दिली होती.

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणारा वेतन वाढीचा करार तातडीने करावा, या व इतर मागण्यांसाठी सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून देशव्यापी बंद पुकारला आहे. कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी लक्ष्मीपुरी येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. दोन दिवस बँका बंद राहिल्याने सुमारे दोन हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले.

सरकारी बँकेतील विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी दोन दिवस ‘काम बंद’ची हाक दिली होती. यासंदर्भात गुरुवारी (दि. ३0) ‘यूएफबीयू’चे प्रतिनिधी व इंडियन बँक असोसिएशन यांच्या झालेली चर्चा विफल ठरली. त्यामुळे शुक्रवारपासून सर्व कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेले. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्यावतीने कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. सुहास शिंदे, पांडुरंग वार्इंगडे, रमेश मोहिते, परेश हटकर, निखिल कुलकर्णी, तेजस्वीनी पाटील, रमेश कांबळे, सूर्यकांत कर्णिक, प्रफुल्ल जाधव, नारायण साळुंखे यांनी सरकारच्या विरोधात तोफ डागली. संपामुळे बँकिंग व्यवहार ठप्प झाले आहेत. क्लिअरिंग बंद झाले असून, एटीएममधील कॅश संपल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.------------------------------जिल्हाधिका-यांना आज भेटणारआज, शनिवारीही संप सुरूच राहणार आहे. लक्ष्मीपुरी येथे सर्व कर्मचारी पुन्हा निदर्शने करणार आहेत. दुपारी १२ वाजता मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देणार आहेत. दरम्यान, प्रत्येक शाखेतून केंद्रीय वित्त मंत्र्यांना ई-मेलने मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.---------------------------प्रमुख मागण्या

  1. - रखडलेला २0 टक्के वेतन वाढीचा करार तत्काळ करावा.
  2. - थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर कायदे करावेत.
  3. - इतर सरकारी कार्यालयाप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा.
  4. - नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.
  5. - बँक कर्मचा-यांच्या कामाचे तास निश्चित करावेत.
  6. - रिक्त जागांवर भरती करावी.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक