शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

MPSC Exam Postponed : कोल्हापुरातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संताप, सायबर चौकात रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 18:34 IST

Mpsc Exam Kolhapur-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा ऐन परीक्षेच्या तोंडावर अवघ्या ३ दिवस आधी पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे परीक्षार्थी उमेदवार संतप्त झाले असून विद्यार्थ्यांनी येथील सायबर चौकात रास्तारोको केला तर ऐतिहासिक बिंदू चौकात काही विध्यार्थी संघटनानी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या संतापाला वाट दिली. दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संतापसायबर चौकात रास्तारोको

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा ऐन परीक्षेच्या तोंडावर अवघ्या ३ दिवस आधी पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे परीक्षार्थी उमेदवार संतप्त झाले असून विद्यार्थ्यांनी येथील सायबर चौकात रास्तारोको केला तर ऐतिहासिक बिंदू चौकात काही विध्यार्थी संघटनानी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या संतापाला वाट दिली. दरम्यान या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला आहे.एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील विद्यार्थी आता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शिवाजी विद्यापीठ तसेच सायबर कॉलेज चौकात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली, मात्र विद्यार्थी मोठ्या संख्येने जमा होऊ लागल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात ऐतिहासिक बिंदू चौकात काही विध्यार्थी संघटनानी जोरदार घोषणाबाजी केली.गुरुवारी सकाळी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरुन याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. शिवाजी विद्यापीठ, सायबर कॉलेज चौक, शिवाजी पेठ येथील अभ्यासिकेतील परीक्षार्थी नाराजी झाले. गेली दीड वर्षे अभ्यास करुन पुस्तकांसाठी इतका खर्च करुनही परीक्षा पुढे गेल्याने ते संतप्त झाले, त्यातच पुण्यात परीक्षार्थी रस्त्यावर उतरल्याने कोल्हापुरातही त्याचे पडसाद उमटले.चार दिवसांपूर्वी हॉल तिकिट संकलीत करण्याची सूचना दिली होती आणि आता परीक्षा पुढे ढकलल्याने त्यांना धक्का बसला. कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये अनेक निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचे या परिपत्रकात आयोगाने म्हटले आहे.इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीतह्व, अशी प्रतिक्रिया परीक्षार्थी विध्यार्थी अक्षय अनिल काजवे यांनी दिली आहे.या परीक्षांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत. नव्या तारखा यथावकाश जाहीर केल्या जातील, असं म्हटल्यामुळे नेमक्या परीक्षा पुन्हा कधी होणार? याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.

कोविड व्यवस्थापन आणि लॉकडाऊन या गोष्टींच्या खेळखंडोबात विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोघडीला लागत आहे, याचा कधी तरी विचार करा. निवडणुका रॅली, सभा, मोर्चे यावेळी निघणारे मार्ग प्रशासनात काम करणातऱ्या एमपीएससी परीक्षेवेळी निघतच नाहीत का ? कोविडची काळजी घेण्याची अक्कल किमान भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे असेल एवढा तरी विश्वास ठेवायला हवा होता. हेच विद्यार्थी उद्या महाराष्ट्र प्रशासनात काम करणारे आहेत याचे किमान भान ठेवुन निर्णय घ्यायला हवा होता ? प्रचंड अभ्यास करून परीक्षाच रद्द केल्यावर चीड, राग येणं स्वाभाविक आहे पण हीच आपली टेस्टिंग आहे. काहीही झालं तरी अभ्यास जसा सुरू आहे, तसाच सुरू ठेवूया.-अक्षय अनिल काजवे,परीक्षार्थी, कोल्हापूर.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाkolhapurकोल्हापूर