शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम’चा निर्णय होऊनही हालचाली ठप्प

By admin | Updated: August 26, 2016 01:12 IST

रुग्णालय हस्तांतरणाची अनिश्चितता : अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला; वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यास कंत्राटदार तयार नाहीत

इचलकरंजी : येथील पालिकेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल शासनाकडे हस्तांतरित करून घेऊ, असा शासनस्तरावर निर्णय होऊन दोन महिने उलटले, तरी हस्तांतरणासंदर्भात हालचाली दिसत नसल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गोरगरिबांसाठी असलेल्या रुग्णालयाकडील अनिश्चिततेच्या परिस्थितीमुळे औषधे व अन्य वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यास कंत्राटदार तयार नसल्याने काही सेवा सुद्धा ठप्प झाल्या आहेत. नगरपालिकेकडे यापूर्वी केईएम हॉस्पिटल होते. त्या रुग्णालयामध्ये ८० खाटांची व्यवस्था होती. मात्र, नगरपालिकेने ३५० खाटांची क्षमता असलेली नवीन रुग्णालयाची इमारत बांधली. सात एकर १२ गुंठे अशा जागेवर असलेल्या या रुग्णालयाचे बांधीव क्षेत्रफळ एक लाख ८४ हजार ७०२ चौरस फूट आहे. रुग्णालयाकडे सध्या १७५ खाटांची व्यवस्था असून, त्यामध्ये कॅज्युअ‍ॅलिटी, प्रसूती, बालरुग्ण, पुरुष व स्त्री आंतररुग्ण, क्षयरोग, अर्भक दक्षता कक्ष, पुरुष शस्त्रक्रिया, महिला शस्त्रक्रिया, महिला विभाग, सेफ्टिक विभाग, असे आंतररुग्ण असून, रुग्णालयाकडे पाच आॅपरेशन थिएटर आहेत.अशा या रुग्णालयाकडे सध्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, टेलिफोन आॅपरेटर, प्लंबर, कार्यालयीन कर्मचारी, वॉर्ड बॉय, आया, सफाई कामगार, वॉचमन, बहुउद्देशीय कर्मचारी, स्वयंसेविका असा एकूण २३७ कर्मचारी वर्ग आहे. याशिवाय कंत्राटी पद्धतीने परिचारिका, लॅब टेक्निशियन, वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ज्ञ, मानद सेवा तज्ज्ञ, एक्स-रे टेक्निशियन, फार्मासिस्ट असे ५८ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर कपडे, चादर व बेडशिट धुलाई आणि रुग्णालयाकडील दैनंदिन साफसफाई या सेवा कंत्राटी पद्धतीने सुरू आहेत. सध्या साधारणत: रुग्णालयाचा एकूण सुमारे ८.५ कोटी रुपये खर्च होत असून, उत्पन्न एक कोटी आहे.या रुग्णालयाचा पालिकेला खर्च पेलावत नसल्याने ते शासनाने वर्ग करून घ्यावे, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आग्रह धरला. त्याप्रमाणे ३० जून २०१६ रोजी रुग्णालया शासनाकडे हस्तांतरित करून घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झाले. याला दोन महिने उलटले तरी हस्तांतरणासंदर्भात शासनस्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसत नसल्याने रुग्णालयाकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. (प्रतिनिधी)