शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एक शेतकरी जरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:33 IST

जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बँकेने घेतली असून, एक जरी शेतकरी वंचित राहिला तर कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजप नेत्यांना दिले. राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आंदोलनाचा कोल्हापुरातच फज्जा उडाल्याची टीकाही त्यांनी केली.

ठळक मुद्देएक शेतकरी जरी कर्जापासून वंचित राहिल्यास कोणतीही शिक्षा भोगीनहसन मुश्रीफ यांचे भाजप नेत्यांना खुले आव्हान

कोल्हापूर : जिल्ह्यात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बँकेने घेतली असून, एक जरी शेतकरी वंचित राहिला तर कोणतीही शिक्षा भोगीन, असे खुले आव्हान ग्रामविकास मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सोमवारी भाजप नेत्यांना दिले. राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आंदोलनाचा कोल्हापुरातच फज्जा उडाल्याची टीकाही त्यांनी केली.वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती आधी घ्यायला हवी होती. ही माहिती घेऊन त्यांनी जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेले नाही, तिकडे हे आंदोलन करायला हवे होते. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन बँकांसमोर करण्याचा निर्णय भाजपने घेतला असताना कोल्हापुरात मात्र हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यावरूनच त्यांच्यावर ओढलेली नामुष्की आणि त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाची हवाच गेल्याचे स्पष्ट होते. जिल्हा बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकाही शेतकऱ्यांना कर्ज देते, मग येथे आंदोलन कशासाठी? असा सवालही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकातून केला.जिल्हा बँकेचे १५८ टक्के पीककर्ज वाटपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समन्वय समितीने जिल्हा बँकेला २०२०-२०२१ या हंगामासाठी खरीप ६८६ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र जिल्हा बँकेने १०८२ कोटी पीक कर्ज वाटप केले. उद्दिष्टाच्या १५८ टक्के कर्ज वाटप करून बँकेने राज्यात अव्वल स्थान पटकावले. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचे पैसे आले नसतानाही शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण