शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

नव्वदीनंतरही ठरले भारी...२३९ वृद्धांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:55 IST

CoronaVirus Kolhapur : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट २१ ते ५० वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील वयाची नव्वदी पार केलेल्या २३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवले असून, हीच सकारात्मकता इतर रुग्णांनी ठेवण्याची गरज आहे. मूळची प्रकृती खणखणीत, कष्टदायी शरीरयष्टी व आजाराला पळवून लावण्याची हिंमत बाळगल्यानेच ते कोरोनाला हरवू शकले आहेत.

ठळक मुद्देनव्वदीनंतरही ठरले भारी...वृद्धांची कोरोनावर मात

समीर देशपांडे कोल्हापूर : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट २१ ते ५० वयोगटातील युवक आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील वयाची नव्वदी पार केलेल्या २३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या सकारात्मक वृत्तीने कोरोनाला हरवले असून, हीच सकारात्मकता इतर रुग्णांनी ठेवण्याची गरज आहे. मूळची प्रकृती खणखणीत, कष्टदायी शरीरयष्टी व आजाराला पळवून लावण्याची हिंमत बाळगल्यानेच ते कोरोनाला हरवू शकले आहेत.गेल्यावर्षी मार्चपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाला प्रारंभ झाला. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा कहर झाला. विशेषत ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होऊ लागले आणि मृतांमध्येही ज्येष्ठ नागरिकांनाच धक्का बसला. त्या तुलनेत यावर्षी मात्र तीव्र स्वरूपाच्या या विषाणूमुळे कमी वयाच्या युवकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येते.असे असले तरी वय जास्त असलेल्या नागरिकांनीही कोरोनावर मात केली आहे. पहिल्या लाटेत ११४ जण कोरोना पॉझिटिव्ह आले तर, त्यापैकी १९८ जणांचा मृत्यू झाला. तर ९६ जणांनी कोरोनावर मात केली. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या दहा महिन्यांतील आहे. तर यावर्षीच्या पहिल्या पाच महिन्यांत १७० नव्वदीच्यावरील नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

  • ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण पॉझिटिव्ह २८४
  • बरे झाले २३९
  • पहिल्या लाटेतील पॉझिटिव्ह ११४
  • दुसऱ्या लाटेतील पॉझिटिव्ह १७०
  • पहिल्या लाटेतील मृत्यू १८
  • दुसऱ्या लाटेतील मृत्यू २७
  • २ ५० ते ६० वयोगटातील सर्वाधिक मृत्यूपहिल्या लाटेवेळी ज्येष्ठ नागरिकांचाच जास्त मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मात्र, दुसऱ्या लाटेवेळी तरुणांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेत ६० ते ७५ वयोगटातील ९६१ तर दुसऱ्या लाटेत गेल्या पाच महिन्यांत ६३२ अशा एकूण १५९३ जणांचा मृत्यू झाला आहे.माझी नोकरी मी सायकलवरूनच ये-जा करून पूर्ण केली आहे. मी पॉझिटिव्ह आलो तरी माझे जेवण व्यवस्थित घेत होतो. नोकरीतून निवृत्त झाल्यानंरही मी कधी व्यायाम चुकवला नाही. याचा मला फायदा झाला.- दादासोा यशवंत पाटील,वय ९७ रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर 
  • कोरोना झाला तरी त्यातून बरे होणार असा मला आत्मविश्वास होता. इचलकरंजीच्या सरकारी दवाखान्यात उपचार घेऊन मी बरी झाले. मात्र वयोमानानुसार होणार त्रास सुरू आहे.-हिराबाई गणपती नाईक,वय ९६ रा. रुकडी, ता. हातकणंगले
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर