शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही शिवरायांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:48 IST

सीबीएसई अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल, इचलकरंजीत शंभूतीर्थचे लोकार्पण

इचलकरंजी : ‘स्वातंत्र्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न झाला. सीबीएसई अभ्यासक्रमातील इतिहासात १७ पाने मुघलांचा इतिहास आणि केवळ १ पॅराग्राफमध्ये छत्रपतींचा उल्लेख केला होता. मोदी सरकारने तो बदलला आणि छत्रपतींच्या इतिहासाला २१ पाने दिली आणि मुघली साम्राज्य एका पॅराग्राफमध्ये आणले. आपल्यालाही जातीपातीच्या भिंती तोडून एक राहावे लागेल. महाराजांचा इतिहास आणि आपले हिंदुत्व कायमस्वरूपी जागृत ठेवावे लागेल’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील के. एल. मलाबादे चौकात साकारण्यात आलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अर्थातच शंभूतीर्थचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, ‘देव-देश आणि धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा केवळ पुतळा नसून प्रेरणा आहे. स्वराज्यासाठी निर्माण केलेल्या इतिहासाचे स्मरण आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे स्मारक आहे. छत्रपतींच्या निधनानंतर महाराष्ट्र काबीज करू, अशी धारणा बनवलेल्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात मराठ्यांनी खोदली, हा इतिहास आहे.’सुरुवातीला रिमोटद्वारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. आमदार राहुल आवाडे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त भगवे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हा लोकोत्सव बनला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा याच चौकात व्हावा, यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे हे सातत्याने आग्रही होते आणि सर्वांच्या सहभागातून तो याठिकाणी उभारण्यात आला. शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरूजी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास सांगितला.कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोक माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, गजानन महाजन गुरूजी, प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, आदी उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी आभार मानले.

मंत्री पाटील यांची महत्त्वाची भूमिकाप्रमुख अतिथी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रम वेळेत पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत सूत्रसंचालकाची सूत्रे स्वत:च हातात घेतली.

परवानगी आणि उभारणीचा उल्लेखशंभूतीर्थाच्या उभारणीसाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरून अवघ्या एका दिवसात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली. तर आयुक्त पल्लवी पाटील यांनी साडेआठ महिन्यांत हे काम पूर्णत्वास नेल्याचे सांगण्यात आले.

नेत्रदीपक आतषबाजी व विद्युत रोषणाईशंभूतीर्थाचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा सकाळी पार पडल्यानंतर संध्याकाळी शंभूतीर्थ परिसरात भव्य विद्युत रोषणाई आणि नेत्रदीपक आतषबाजीने संपूर्ण शहर प्रकाशमय झाले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Efforts to suppress Shivaji's history persisted post-independence: CM Fadnavis

Web Summary : CM Fadnavis alleges attempts to suppress Shivaji Maharaj's history even after independence. He credits the Modi government for increasing the coverage of Shivaji's history in the CBSE curriculum. A statue of Sambhaji Maharaj was inaugurated, symbolizing inspiration and sacrifice.