शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शहरवासीयांच्या हद्दवाढीच्या मागणीला पूर्णविराम देत राज्य सरकारने अखेर कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांच्या संतुलित विकासासाठी ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. या संदर्भातील अधिसूचनेवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, त्याची अधिकृत शासकीय अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात एक-दोन दिवसांत प्रसिद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शहरवासीयांच्या हद्दवाढीच्या मागणीला पूर्णविराम देत राज्य सरकारने अखेर कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांच्या संतुलित विकासासाठी ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. या संदर्भातील अधिसूचनेवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, त्याची अधिकृत शासकीय अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात एक-दोन दिवसांत प्रसिद्ध होईल. प्राधिकरणाबाबतची अधिसूचना बुधवारी राज्य सरकारचे सहसचिव श्री. द. लांडगे यांनी जारी केली.‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हद्दवाढीच्या प्रश्नावरून शहर आणि ग्रामीण जनताअसा निर्माण झालेला वाद संपुष्टात आला असून, कोल्हापूर शहर आणि त्याच्या परिसरातील ४२ गावांचा संतुलित तसेच नियंत्रित विकास होण्याचा मार्गहीमोकळा झाला आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणातून शहरालगतच्या शिरोली व गोकुळ शिरगाव या दोन औद्योगिक वसाहती तसेच वडगाव व कागल या नगरपालिका वगळण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे क्षेत्र विकास प्राधिकरण यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागासाठी स्थापन झाले असून, त्याचे परिणामही चांगले दिसून येत आहेत.कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय कृती समितीने हद्दवाढ मागताना शहराला लागून असलेली १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींची मागणी केली होती. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले होते. तथापि, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबई येथे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीऐवजी हा प्राधिकरणाचा विषय समोर ठेवला होता. तो अखेर मान्य झाला.पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेप्रमाणे प्राधिकरणात मात्र ४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे १८ गावांव्यतिरिक्त ज्या २४ गावांचा नव्याने प्राधिकारणात समावेश झाला आहे, त्या गावांतील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता घेतला जाणार निर्णय अन्यायकारक होईल, अशी भावना या गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या गावांचा होईल समावेशनव्याने अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणात ४२ गावांचा समावेश आहे. त्यामध्ये शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली, वळिवडे, गांधीनगरसहित चिंचवाड, मुडशिंगी (न्यू वाडदेसहित) सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, सादळे-मादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव यांचा समावेश आहे. मात्र, यामधून कागल, वडगाव वगळण्यात आले आहे.ं२४ गावांतील ग्रामस्थांची होणार बैठक : चंद्रदीप नरकेदरम्यान, ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे मार्ग असलेले घरफाळा वसुली, पाणीपट्टी वसुली, चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणारा निधी, तसेच शासनाकडून येणारा निधी याला कोणतीही बाधा येणार नसेल.२ तसेच त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहणार असतील आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळणार असेल तर प्राधिकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.३ तथापि, अचानक ज्या २४ गावांचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे, त्या गावांतील ग्रामस्थांशी आधी चर्चा करूनच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.