शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसह चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:41 IST

Agriculture Sector kolhapur-कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देकोल्हापूरसह चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन कराप्रफुल्ल कदम यांची उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एकूण जमिनींपैकी तब्बल ३७.५ टक्के क्षेत्राचा म्हणजे ११६.१२ लाख हेक्टर एवढ्या मोठ्या जमिनीचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील एकूण नऊ कृषी हवामान विभागापैकी चार कृषी हवामान विभागांत विद्यापीठाचे क्षेत्र व्यापले आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे विद्यापीठ प्रचंड विस्तार आणि भौगोलिक सलगतेअभावी आपल्या अधिपत्याखालील क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही. यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे.

या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कृती समिती स्थापन केली असून, पश्चिम महाराष्ट्रासोबतच उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांचाही पाठिंबा या कृषी विद्यापीठासाठी घेणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.सांगोला, पंढरपूर विद्यापीठासाठी योग्य तालुकेचार जिल्ह्यांची सोय व उपलब्ध जागा पाहता, सांगोला किंवा पंढरपूर तालुके हे मध्यवर्ती असल्याने येथे स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास राहुरी विद्यापीठाचा थेट फायदा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना होऊ शकतो. येथे आदिवासींची संख्या अधिक असून, या भागात पारंपरिक शेती करणारा मोठा समुदाय आहे. नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून आधुनिक शेतीच्या प्रवाहात वेगाने आणता येईल, असेही कदम यांनी सरकारला पटवून दिले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर