शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 13:04 IST

महावितरणने यंदापासून वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता परिमंडलस्तरावर वर्षातून दोनवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलाने आपला पहिलाच कार्यक्रम मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा केला.

ठळक मुद्दे ऊर्जा-2020 कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर:

दररोजच्या कामातून येणारे ताण-तणाव कमी करण्यासाठी महावितरणकोल्हापूर परिमंडलाने 31 जानेवारी रोजी सायंकाळी ह्यऊर्जा झ्र 2020ह्ण हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास वीज कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने वीज कर्मचाऱ्यांचा नुसता ताण-तणावच दूर केला नाही तर त्यांना नवी ऊर्जा सुद्धा दिली.महावितरणने यंदापासून वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता परिमंडलस्तरावर वर्षातून दोनवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची सुरुवात केली आहे. कोल्हापूर परिमंडलाने आपला पहिलाच कार्यक्रम मोठ्या दणक्यात व उत्साहात साजरा केला. त्यासाठी ताराबाई पार्कातील ह्यविद्युत भवनह्णला रंगरंगोटी करुन त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत भवन परिसरातील पार्किंगच्या खुल्या जागेत आयोजित केल्याने कर्मचाऱ्यांनी गुलाबी थंडीत संगीताची मेजवानी लुटली.

यासाठी सांगली येथील ह्यव्हर्साटाईल इव्हेंटह्ण या ऑर्केस्ट्रासह स्टॅण्ड-अप् कॉमेडी फेम अजितकुमार कोष्टी ऊर्फ ह्यगण्याह्णला निमंत्रित केले होते. गण्याने केलेल्या विनोदांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तर ऑर्केस्ट्रा कलाकारांनी एकाहून एक सरस गाणी सादर करुन वातावरण प्रफुल्लित ठेवले. त्यांच्या गाण्यांवर चिमुकल्यांसह कर्मचाऱ्यांनीही नृत्यसाज चढवला.कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले यांनी केले. यावेळी मंचावर कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता श्री. अंकुर कावळे, सांगलीचे प्रभारी अभियंता श्री. पराग बापट, सहा. महाव्यवस्थापक श्री. सुनील पाटील, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र देसाई व समन्वयक तथा उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भूपेंद्र वाघमारे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सुमारे दीड हजारांहून अधिक वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी त्यांच्या कुटुंबासह सहभागी झाले होते. चहा, नाष्ता व जेवणासह बालगोपालांसाठी खेळण्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शकील महात यांनी केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर