शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांनी देशाची सीमा ओलांडावी

By admin | Updated: October 22, 2016 01:22 IST

धनंजय महाडिक : लघु-मध्यम उद्योजकांची आयात-निर्यातविषयक कार्यशाळा

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत आपल्या देशाच्या उत्पादनांना अधिक मागणी आहे. आपल्या उद्योजकांमध्ये क्षमता आहे; पण त्यांनी स्वत:ला एक मर्यादा घालून घेतली आहे. त्यांनी निर्यातीचे धाडस करून विकासासाठी देशाची सीमा ओलांडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी शुक्रवारी येथे केले.येथील ‘एसएमई मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्स्पोर्टर्स समिट’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र इंडस्ट्रियल अ‍ॅँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि एसएमई चेंबर आॅफ इंडियातर्फे लघु व मध्यम उद्योजकांचा विकास व निर्यातवाढीसाठी परिषद घेण्यात आली. हॉटेल सयाजीमधील या कार्यक्रमास घोडावत एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रेणिक घोडावत, एसएमई चेंबर आॅफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे प्रमुख उपस्थित होते. खासदार महाडिक म्हणाले, कौशल्यपूर्ण व दर्जेदार उत्पादन निर्मितीची क्षमता असणाऱ्या कोल्हापुरातील उद्योजकांनी ग्लोबल व्हावे. त्यांना जगभरात अनेक संधी उपलब्ध असून ते साधण्याच्या दृष्टीने कार्यरत राहावे. यासाठी उद्योजकांनी ‘एसएमई’ची मदत घ्यावी. व्यवस्थापकीय संचालक घोडावत म्हणाले, उद्योजकांनी पाच वर्षांचा आराखडा डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी. स्वत:चा ब्रॅँड विकसित करताना संबंधित देश लक्षात घ्यावा. जागतिक बाजारपेठेत कोल्हापूरचा ठसा उमटवायचा असल्यास उद्योजकांना बळ देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.अध्यक्ष साळुंखे म्हणाले, जगातील ४६ देशांशी एमएमई चेंबर आॅफ इंडिया कार्यान्वित आहे. जानेवारीमध्ये ‘वेस्टर्न महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिट- डेस्टिनेशन कोल्हापूर’ घेण्यात येईल. कार्यक्रमास ‘एसएमई’चे संचालक महेश साळुंखे, आदींसह कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर परिसरातील उद्योजक उपस्थित होते.दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील ‘एसएमई’चे प्रमुख अजय ठाकूर, स्टेट बँक आॅॅफ इंडियामधील ‘एसएमई’चे जी. एस. राणा, ‘एसआयडीबीआय’चे कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक भगवान चंदाणी, ईसीजीसी लिमिटेडचे अफसाना शेख, पुण्यातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक सचिन तिजारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. (प्रतिनिधीनियोजनबद्ध प्रयत्न करावेतचिनी वस्तूंना विरोध वाढत असल्याने जगात आपला देश ‘नेक्स्ट डेस्टिनेशन’ म्हणून भविष्यात निश्चितपणे पुढे येणार आहे. ते लक्षात घेऊन उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. ते म्हणाले, सामूहिक शेती अथवा शेतकऱ्यांनी एकत्रित यावे. उद्योजकांनी संघटित व्हावे. उत्पादनाचे मार्केटिंग करण्यासह दर्जेदार उत्पादनांची संख्यात्मक मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.